मोरजी समुद्र किनाऱ्यावर छोट्यांकडून किल्ला

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

काहीजणांना जवळ समुद्र आहे, तेथील मुले किनाऱ्यावर आपल्या आईवडिलासोबत वाळून किल्ले करण्यासाठी मग्न असतात. परंतु टाळेबंदीमुळे मुलांच्या आईवडिलांवरही दडपण आहे.

मोरजी,

कोरोनामुळे बच्चे लोकांची सुट्टी वाया गेलीच, शिवाय घरातूनही बाहेर पडता येत नाही किंवा नातेवाईकांकडे जाता येत नाही. नातेवाईक आपल्या घरीही येत नाहीत. नक्की या सुट्टीत करायचे काय? या संभ्रमात असलेली काही मुले जवळच्या समुद्र किनाऱ्यावर वाळूत खेळत आहेत.
काहीजणांना जवळ समुद्र आहे, तेथील मुले किनाऱ्यावर आपल्या आईवडिलासोबत वाळून किल्ले करण्यासाठी मग्न असतात. परंतु टाळेबंदीमुळे मुलांच्या आईवडिलांवरही दडपण आहे. सुटीत ही  छोटी मुले इकडे -तिकडे फिरायला जात होती, सुटीत वेगवेगळे वर्ग सुरू होते. परंतु या आगळ्यावेगळ्या सुटीत आई-बाबासह सर्वजण घरी आहेत, पण बाहेर घेऊन जात नाहीत. त्यामुळे मुलांना ही अशी कसली सुटी? असा प्रश्न पडला आहे. मुले खूपच कंटाळळी असून जवळ शेत असलेल्याची मुले शेतात, समुद्र जवळ असेल तर समुद्र किनाऱ्यावर नजर चुकवून जात असून तेथे आपला वेळ घालवत आहेत.

संबंधित बातम्या