गोमन्‍तक चित्रकला स्‍पर्धेला राज्‍यभरातून उदंड प्रतिसाद

Dainik Gomantak
रविवार, 12 जानेवारी 2020

पणजी, 
लहान मुलांच्‍यात डोक्‍यात कल्‍पकतेचा आणि सर्जनशीलतेचा खजाना भरलेला असतो. त्‍यांच्‍यातल्‍या नाविन्‍यपुर्णतेला जर वेळीच व्‍यासपीठ उपलब्‍ध करून दिले तर त्‍यांच्‍यात लपलेला कलाकार डोके वर काढू शकतो. सकाळ माध्‍यमसमूह आणि दै. गोमन्‍तकतर्फे दरवर्षी महाराष्‍ट्र आणि गोवा या दोन्‍ही राज्‍यात चित्रकला स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येते. यावर्षीची स्‍पर्धा आज राज्‍यभरात पार पडली आणि या स्‍पर्धेला विद्यार्‍थ्‍यांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद लाभला. राज्‍यभरातील एकुण १२ केंद्रांमध्‍ये पार पडलेल्‍या या स्‍पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्‍येत सहभागी झाले होते. 

दै. ‘गोमन्‍तक’मध्‍ये प्रसिध्‍द करण्‍यात आलेले विशेष कुपन घेऊन विद्यार्थ्यांना या स्‍पर्धेत विनामूल्‍य सहभागी होण्‍याची संधी मिळाली. ही स्‍पर्धा पीपल्‍स हायस्‍कूल, पणजी, एल. डी. सामंत मेमोरियल हायस्‍कूल (विद्या प्रबोधनी) पर्वरी, जनता हायस्‍कूल, म्‍हापसा, भगवती हायस्‍कूल, पेडणे, शांतादुर्गा हायस्‍कूल, डिचोली, हनुमान विद्यालय, वाळपई, ए. जे. डी. आल्‍मेदा हायस्‍कूल, फोंडा, शारदा इंग्‍लिश हायस्‍कूल, मार्शेल, मल्‍लिकार्जुन विद्यालय हायस्‍कूल, काणकोण, म्‍युनिसिपल हायस्कूल, वास्‍को आणि भाटिकर मॉडेल हायस्‍कूल, मडगाव या केंद्रांवर पार पडली.  
येथे स्‍पर्धेसाठी आलेल्‍या पालकांनीही दै. गोमन्‍तकच्‍या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. मोठ्या गटातील विद्यार्‍थ्‍यांसह बालचमुनेही या स्‍पर्धेचा आनंद लुटला. 

मला चित्रे काढायला आवडतात, मागील वर्षीही मी या स्‍पर्धेत सहभाग घेतला होता. यावर्षी मी वाढदिवसाच्‍या पार्टीचे चित्र काढले असून मला चित्रकला स्‍पर्धा आवडत असल्‍याचे मत विद्यार्थी आदित्‍य मोटे याने व्‍यक्‍त केले. 
 
संबंधित बातम्या