सार्दिन, केव्‍हातरी खरे बोला ना? चर्चिल आलेमाव यांची टीका 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

नावेली : दक्षिण गोवा लोकसभा खासदार फ्रान्‍सिस सार्दिन हे कायमच खोटे बोलत आले, ते कधी खरे बोलणार? त्यांनी केलेले घोळ गोव्यातील लोकांना अजूनही माहित आहेत. सार्दिन हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी १०० कोटी रुपयांचा बाँड घोटाळा केला होता. ते उच्चवर्णीय असल्याने त्यांना अटक झाली नाही किंवा दोषी ठरवले नाही. असा कुठला राजकारणी आहे ज्याने गोव्यात पक्षांतर केले नाही. आठ आमदारांना सोबत भाजपाला पाठिंबा देऊन पर्रीकर सरकार सत्तेवर आणले होते, अशी माहिती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पंचायत उमेदवार वानिया बाप्तीस्ता, सावियो आलेमांव व इतर मान्यवर उपस्थित होते.आपण डॉ. प्रमोद सावंत सरकारला विकासाच्‍या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. सार्दिन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोलण्या अगोदर आपल्या घरातील (कॉंग्रेस) पक्षातील कचरा काढावा. काँग्रेस पक्ष संपत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपक्षा पेक्षाही मोठा आहे. शरद पवार साहेब एक चांगले नेते आहेत, असेही ते म्‍हणाले.

आलेक्‍स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दोनवेळा फ्रान्‍सिस सार्दिन यांचा पराभव केला. सार्दिन व प्रतापसिंह राणे यांनी मोपा येथे विमानतळ आणला. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी अनेक चांगली कामे केली. ज्यावेळी आपण सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, त्यावेळी जर आपल्याला १० जागा दिल्‍या असत्‍या, तर गोव्यात आज ही वेळ आली नसती. सार्दिन व रेजिनाल्ड यांना जर पुन्हा एकदा राजकारणातून संपवण्यासाठी आपण केव्हाही तयार आहे. रेजिनाल्ड यांनी बाणावली मतदारसंघात जिल्हापंचायत उमेदवाराचा रात्रीच्यावेळी प्रचार न करता हिम्मत असल्यास त्यांनी दिवसा प्रचार करावा, असे आव्हान रेजिनाल्ड यांना दिले.

काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षनी आपल्याला दुखावेल आहे. दोन्ही पक्षानी आपल्याला तुरुंगात टाकले होते. मात्र गोव्यातील लोकांनी आपल्याला सांभाळले.आपला बाणावली मतदार संघातील मतदारांवर विश्‍वास आहे. बाणावलीतील लोक सुशिक्षित आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जिल्हा पंचायत निवडणुकीत आपल्या दोन्ही उमेदवारांना नक्कीच विजयी करतील, यावर आपला विश्‍वास आहे, असे आलेमांव यांनी शेवटी सांगितले.

संबंधित बातम्या