कणको बेटावरील हालचालींमुळे नागरिकांत संभ्रम

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

काणकोणः पाळोळे गावचे वादळ वाऱ्यापासून संरक्षण करणाऱ्या कणको बेटावर हालचाली सुरू झाल्यामुळे येथील नागरिकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र बेटावर राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने नौदलाकडून टेहाळणी बुरूज उभारण्यासाठी या बेटाची पाहणी करण्यात आली असल्याचे मामलेदार विमोद दलाल यांनी सांगितले.

मागे नौदलाच्या सी बर्डचा विस्तार पाळोळे पर्यंत करण्यात येणार अशी वदंता होती. त्यासाठी नौदलामार्फत सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. या आठवड्यात नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत काणकोणचे मामलेदार विमोद दलाल व उपजिल्हाधिकारी प्रितीदास गावकर यांनी या बेटाची पाहणी केली. मात्र या पाहणीची येथील लोकप्रतिनिधींना कोणतीच माहिती नव्हती. यासंदर्भात नगरसेवक दयानंद पागी व दिवाकर पागी यांनी प्रथम संशय व्यक्त केला होता.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

या बेटाची मूळ मालकी गायतोंडे परिवाराकडे होती, मात्र काही वर्षामागे हे बेट परप्रांतीयांना विकण्यात आले. त्याने या बेटावर पर्यटक कुटिरे उभारून समुद्रात बेटावर जाण्यासाठी लाकडी पुलही उभारला होता, त्याला स्थानिक नगरसेवक व मत्यव्यावसायिकांनी विरोध केला होता.

संबंधित बातम्या