पेडे - म्‍हापशात जॉगर्स असोसिएशनकडून स्‍वच्‍छता मोहीम

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

म्‍हापसा:जॉगर्स सोशल असोसिएशनतर्फे (जेएसए) पेडे म्हापसा येथे नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

म्‍हापसा:जॉगर्स सोशल असोसिएशनतर्फे (जेएसए) पेडे म्हापसा येथे नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
पेडे येथील यूथ हॉस्टेल समोरील जागेत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. मुख्यत: अज्ञाताकडून रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत होता.प्लास्टिक व कचऱ्याचे जणू साम्राज्यच तिकडे निर्माण झाले होते.येथील स्थानिक रहिवाशांकडून नगरपालिका व शासन दरबारी वारंवार तक्रार करूनही परिस्थितीमध्ये काही विशेष फरक पडला नाही.सामाजिक बांधिलकी या नात्याने जॉगर्स सोशल असोसिएशनच्या पुढाकाराने रविवार ता. १२ जानेवारी रोजी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हटवून त्याजागी कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्वखर्चाने जाळी बसवण्यात आलेली आहे.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य असल्याने समाजिक कार्यासाठी ‘जेएसए’ परिवार सदैव तत्पर असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विनायक आरोलकर यांनी सांगितले. तसेच ‘स्वच्छ भारत’ या राष्ट्रीय अभियानाला अनुसरून लोकांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन त्यांनी केले.या योजनेला लागणारे साहित्य दिगंबर हरमकर व संतोष कोरगावकर यांनी पुरस्कृत केले.शेवटी ‘जेएसए’ सचिव हेमंत नागवेकर यांनी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे आभार मानले.

 

 

 

 

पर्यटन खात्याच्या अनास्थेमुळे पर्यटक संख्या रोडावली : साटेलकर

संबंधित बातम्या