कारकून पद परीक्षेत त्रुटी   

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

अव्वल कारकूनच्या परीक्षेतील
प्रश्‍नपत्रिकेसंदर्भातची याचिका फेटाळली

पणजी : गोवा सरकारने अव्वल कारकून पदे भरण्यासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेतील ५० पैकी ६ प्रश्‍नांमध्ये त्रुटी होत्या.

त्यामुळे त्यासाठीचे पूर्ण गुण देण्यासाठी गोवा सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी सिधराज उल्हास गावस याने सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली. याचिकेमध्ये दिलेली कारणे योग्य वाटत नसल्याने या लेखी परीक्षेत गोवा खंडपीठ हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

याचिकादार सिधराज गावसयाने अव्वल कारकून पदासाठीची लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी ५० प्रश्‍न विचारण्यात आले होते त्यातील ६ प्रश्‍नांमध्ये त्रुटी होत्या अथवा त्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायामध्येही चुका होत्या. या चुकांसाठी या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्याचे पूर्ण गुण मिळायला हवेत अशी बाजू याचिकादाराने मांडली होती. याचिकादारतर्फे ॲड. विवेक रॉड्रिग्ज यांनी ही बाजू मांडली. यावेळी त्यांनी खंडपीठासमोर प्रश्‍नपत्रिकेतील त्रुटी असलेल्या प्रश्‍नांचे उदाहरणे मांडली.

 हेही वाचा : ८० हातगाड्यांचे परवाने निलंबित!

याचिकादाराच्या वकिलची बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की या प्रश्‍नपत्रिकेतील त्रुटी या गंभीर वाटत नाहीत. परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्‍न व त्यासंदर्भात दिलेल्या माहितीवरून प्रश्‍न किंवा दिलेले पर्याय हे चुकीचे आहेत असा निष्कर्ष काढता येणार नाही. प्रश्‍न चुकीचे आहेत त्याला दिलेली कारणेही योग्य वाटत नाहीत, असे याचिका फेटाळताना आदेशात म्हटले आहे.

संबंधित बातम्या