कोरोनाबाबत सतर्कता समितीची नेमणूक

Dainik Gomantak
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पणजी, ता. २७ (प्रतिनिधी)
चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना वायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटलं जातं) आता भारतातही दक्षता बाळगली जात आहे. देशात कोरोनाबाधित एकही रूग्‍ण सापडला नसला तरी राज्‍य आरोग्‍य खात्‍याने सतर्कता बाळगण्‍यासाठी समितीची नेमणूक केली आहे. या समितीमध्‍ये सरकारी दवाखान्‍यासह आरोग्‍याशी निगडीत असणार्‍या खात्‍यातील सदस्‍यांचा समावेश आहे. हि समिती केवळ भविष्‍यातील सर्तकता म्‍हणून नेमलेली असून घाबरण्‍याचे कारण नसल्‍याचे आवाहन आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी जनतेला केले आहे. 

राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकातासह देशातील एकुण १५ विमानतळांवर थर्मल स्क्रिंनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानतळांच्‍या यादीत गोव्‍याचे नाव नाही. चीनमधून गोव्‍यात एखादा प्रवासी येण्‍याचे झालेच तर तशी पुर्वसूचना विमानतळ व्‍यवस्‍थापनाकडून देण्‍यात येणार असून यानंतर संबंधित व्‍यक्‍तीचे चेकअप करण्‍यात येणार आहे. देशभरात चीन आणि हाँगकाँगहून परतलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. 

गोव्यात कोरोनाव्हायरसशी निगडीत प्रत्‍येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी मी एक विशेष समिती तयार करण्यात आली आहे. व्हायरस ग्रस्त भागातून आलेल्या लोकांसह सर्व कामांवर बारकाईने नजर ठेवली जाईल आणि राज्य मुख्य सचिवांना कळविण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. हि समिती केंद्रीय आरोग्‍य खात्‍याकडून मिळालेल्‍या मार्गदर्शन तत्‍वांनुसार कार्यरत राहणार असल्‍याचेही ते म्‍हणाले.  
 
संबंधित बातम्या