खलाशांवरून कॉंग्रेसची सरकारवर टीका

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना ईमेल द्वारे पत्र पाठवुन गोमंतकीय दर्यावर्दी, खलाशांची तपशिलवार माहिती दिली.,ॉ त्यानंतरच मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना जाग आली व आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानी गोवा सरकार पुढिल दोन दिवसांत खलाशांची माहिती केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकातून केली आहे.

पणजी,

त्यांनी म्हटले आहे, की दर्यावर्दिना परत आणण्यासाठी भाजपच्या केंद्र व राज्य सरकारची नेमकी कोणती भूमिका आहे हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे. हजारो गोमंतकीयांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न असून, भावनांशी खेळ केल्यास त्याचे पाप भाजपला भोगावेच लागेल. आज टाळेबंदी होऊन २५ दिवस झाले व मागील महिनाभर हे खलाशी तसेच त्यांचे नातेवाईक दर्यावर्दिना परत गोव्यात आणण्याची हात जोडून सरकारकडे याचना करीत आहेत. परंतु, सरकार स्वस्थ बसून राहिले असून, मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्यावरुन त्यानी एवढे दिवस काहीच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेपोटी सरकारची असंवेदनशीलता परत एकदा लोकांसमोर आली आहे व गोमंतकीय भाजप सरकारला कदापी माफ करणार नाहीत.
गोव्याचे खलाशी असलेली दोन जहाजे आज मुंबईजवळ उभी असून, त्यातील खलाशाना मायदेशात उतरू देण्यास टाळाटाळ होत आहे. आपल्या मातृभूमित पाय ठेवण्यास भारतीयांनाच बंधन घालणारे भाजपचे जगातले पहिले सरकार आहे अशी टीका करून त्यांनी म्हटले आहे, की टाळेबंदी जाहिर झाल्यानंतर दाबोळी विमानतळावरुन  गोव्यात अडकलेल्या हजारो विदेशी पर्यटकांना घेऊन सुमारे २२ विमानांनी आजपर्यंत वेगवेगळ्या देशांसाठी उड्डान केले असुन त्यात इग्लंड, जर्मनी, फ्रांस, रशिया, स्पेन, स्विस्झर्रलेंड, इटाली, स्विडन या देशांचा समावेश आहे. इटली-स्पेन या देशांत कोरोनाची भयानक लागण झालेली असतानाही तेथील सरकार आपल्या नागरीकाना मायदेशी परत घेते याचा धडा मुख्यमंत्र्यानी घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या