काँग्रेसच्या नेत्यांची अळीमिळी गुपचिळी : आलेक्स रेजिनाल्ड

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

नावेलीः सत्ताधारी पक्षाकडे आपले संबंध बिघडू नयेत यासाठी काँग्रेसचे एक ज्येष्ठ आमदार सरकारच्या विरोधात काहीच बोलत नाहीत, असा आरोप कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला. जनतेच्या भावना जाणून घेऊन जनतेचे नेतृत्व करण्यास कॉंग्रेसचे नेते मागे पडत आहेत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या साकवाळ मतदारसंघात पक्षाचा उमेदवार उभा करण्यात हलगर्जीपणा झाला असून या प्रकारास जबाबदार असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यावर कारवाई होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे सत्ताधारी भाजप सरकारशी चांगले संबध आहेत. कॉंग्रेसच्या पाच आमदार असून यापैकी एक वरिष्ठ आमदार आपण आपली प्रतिमा का खराब करावी यासाठी सरकारच्या विरोधात काहीच बोलत नाहीत, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

राजकारण्यांनी गोवेकरांचे हीत जपले पाहिजे. गोवेकरांचे नेतृत्व करणारा नेता पाहिजे. गोव्याच्या लोकांना कॉंग्रेस पक्षाला नेतृत्व दिले होते. गोव्यातील लोकांना नेतृत्वाची अपेक्षा कॉंग्रेस पक्षाकडून आहे. गोवेकर वेळेवर जागृत झाले नाहीत, तर गोवा हाताबाहेर जाईल अशी भिती रेजिनाल्ड यांनी व्यक्त केली.
सांकवाळ मतदारसंघात कॉंग्रेस गाफील राहिल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला.

प्रतिस्पर्ध्याला स्वतःहून पुढे चाल देण्याचा हा प्रकार आहे. या प्रकारास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज असून कारवाई न झाल्यास या प्रकारास पक्षाची मान्यता आहे असा जनतेचा समज होईल, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या