विर्नोडा येथे भुयारीमार्ग न ठेवल्यास लोकांच्या पाठिंब्याने पुढचा निर्णय

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

कॉंग्रेस महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचा इशारा

वळपे विर्नोडा येथे पत्रकार परीषदेत बोलताना प्रतिमा कुतिन्हो.सोबत सुभाष केरकर, देवेंद्र परब, सहदेव परब व कॉंग्रेस महिला कार्यकर्त्या

पेडणे : विर्नोडा गाव, सोणये-तुये, आराबो व जवळच्या परीसरातील लोकांना वळपे येथे नाक्यावर भुयारीमार्ग हा ठेवलाच पाहिजे आणि ती सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपली जबाबदारी न झटकता आपल्या जवाबदारीला जागावे, अन्यथा जनतेच्या सहाय्याने पुढचा निर्णय घेऊ, असा इशारा गोवा प्रदेश कॉंग्रेस महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी वळपे-विर्नोडा येथे पत्रकार परीषदेत बोलताना दिला.

यावेळी त्यांच्यासोबत सुभाष केरकर, विर्नोडाचे माजी सरपंच देवेंद्र परब, लालन पार्सेकर, रेखा परब, पार्वती नागवेकर, प्रथा शेट, कमलाकांत परब, सहदेव परब व राजन शेट्ये उपस्थित होते.
प्रतिमा कुतिन्हो पुढे म्हणाल्या, चारपदरी मार्गाचे सर्वे करताना सगळ्या गावांचा अभ्यास करणे आवश्यक होते. स्थानिक सरकार व आमदारांनी त्यासाठी जागृत रहाणे गरजेचे होते. परंतु, स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर व आमदार दयानंद सोपटे या दोघांनीही आपणाला लोकांशी देणे-घेणे नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. येथे उड्डाणपूल न ठेवले तर लोकांना नाहक चार किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे आजारी रुग्ण व महिलांना प्रसुतीदरम्यान उपचारासाठी नेताना त्यांच्या जीवावरही बेतू शकते. आपत्कालीन दुर्घटनेवेळी अग्निशामक दलाचा बंब येण्यास बराच वेळ जाऊ शकतो. कित्येक वर्षे निवडून येऊन मनोहर आजगावकर यांनी जनतेच्या हितापेक्षा आपलेच हित पाहिले आहे.

रेखा परब म्हणाल्या, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना या ठिकाणी उड्डाणपूल झालेला नको आहे. या कारणामुळेच ते या ठिकाणी उड्डाणपुलाला ‘खो’ घालीत आहेत. परंतु आम्ही या ठिकाणी उड्डाणपूल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

हे कर्मचारी झाले सेवेत कायमस्वरूपी

सुभाष केरकर म्हणाले, विर्नोडा गाव पेडणे व मांद्रे अशा दोन्ही मतदारसंघात विभागलेला आहे. दोन्ही आमदार हे सध्या एकाच पक्षात आहेत. येथील लोकांनी चारपदरी मार्गावर कसे यावे, हे दोघांनी येथे पाहणी करून सांगावे व समस्या सोडवाव्यात. विर्नोडाचे माजी सरपंच देवेंद्र परब म्हणाले, उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी येथे भेट देऊन उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग असायाला पाहिजे म्हणून सहमती दर्शविली. आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन उड्डाणपुलासाठी खासदार निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. पण, अद्याप उपाययोजना झालेली नाही.

संबंधित बातम्या