काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ मागे घ्‍या
काँग्रेसची निदर्शने व महागाईविरोधात घोषणाबाजी

पणजी : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ केल्‍याचा निषेध महिला काँग्रेसने आज पणजीत नोंदवला. सिलिंडरचा दर १४५ रुपयांनी वाढला असून महिलांनी गॅसचा वापर न करता पुन्‍हा चूल आणि लाकडे गोळा करण्‍यासारख्‍या कामांकडे वळावे, असे या सरकारला वाटते.

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांना जर राज्‍यात खरीच काळजी असेल तर त्‍यांनी राज्‍यात सबसिडीच्‍या माध्‍यमातून गॅसचा दर कमी करून द्यावा, असे मत महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा प्रतिमा कुतिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केले.

गॅस दरवाढीविरोधात महिला काँग्रेसने पणजी बाजारपेठेत आंदोलन केले. यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी चूल पेटवली आणि त्‍यावर चहा करून सर्वांना पाजून निषेध नोंदवला. यावेळी त्‍यांनी राज्‍य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाही दिल्‍या.

काँग्रेसच्‍या काळात ३५० ते ४०० रुपयांत मिळणाऱ्या गॅसची किंमत आता एक हजारच्‍या घरात पोहोचली आहे. सरकारच्‍या चुकीच्‍या नियोजनामुळेच लोकांवर ही वेळ आली आहे. आज आम्‍ही येथे हा विरोध सर्वसामान्‍य महिलांच्यावतीने करीत असल्‍याचे कुतिन्‍हो म्‍हणाल्‍या.

 

 

 

 

जबाबदारीची जाणीव हवी

 

 

 

 

 

संबंधित बातम्या