काणकोणमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गांधीगिरी

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

.सरकार बसस्थानकाची दुरूस्ती करण्यास अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ कॉग्रेस कार्यकर्त्यांनी माडांच्या झावळ्यानी बसस्थानकाचे छप्पर शाकरण्याचा प्रयत्न केला.

काणकोण

सरकार काणकोण बसस्थानकाचे गळके छप्पर दुरुस्त करत नसल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झावळ्यांच्या सहाय्याने या छप्पराची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला.  पावसाळ्या पूर्वी कदंब बसस्थानकाच्या छप्पराची दुरूस्ती करण्याची मागणी कॉग्रेसतर्फे करण्यात आली आहे.गुरूवारी प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, महादेव देसाई व अन्य कार्यकर्त्यांनी बसस्थानकाला भेट देऊन पहाणी केली.उडालेल्या छप्पराची दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात बसस्थानक जलमय होणार आहे त्याचा फटका येथील दुकानदाराना बसणार असल्याचे भंडारी व देसाई यांनी सांगितले.सरकार बसस्थानकाची दुरूस्ती करण्यास अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ कॉग्रेस कार्यकर्त्यांनी माडांच्या झावळ्यानी बसस्थानकाचे छप्पर शाकरण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला.त्याचप्रमाणे पोलिसाकरवी उपजिल्हाधिकारी प्रितिदास गावकर यांनी  या कार्यकर्त्यांना कार्यालयात बोलावून त्याच्याशी चर्चा केली.यावेळी पावसाळ्यापर्यत बसस्थानकाची दुरूस्ती न झाल्यास बसस्थानक धोकादायक म्हणून जाहीर करून बसस्थानकाचे अन्यत्र दुरस्ती होई पर्यंत स्थलांतर करावे ही मागणी उपजिल्हाधिकाऱ्यानी मान्य केली असल्याचे संदेश तेलेकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून आल्यानंतर सांगितले. येथील दुकानदाराचे पावसाळ्यात अपरमित नुकसान होणार आहे त्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून माडाच्या झावळ्या व प्लास्टिक ताडपत्रीने छप्पर झाकण्याचा प्रयत्न होता त्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला मात्र लॉकाऊन नंतरही महामंडळ दुरूस्ती करण्यास अपयशी ठरल्यास ताडपत्रीने बसस्थानकाचे छप्पर झाकण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडीस. यांना विचारले असता  छप्पराचे पत्रे उडालेल्या काणकोण कदंबा बसस्थानकाची दुरूस्तीसाठी निविदा जाहीर झाली आहे.२९ लाख३७ हजार६३५ रूपये खर्चून छप्पराचे पत्रे बदलण्याबरोबरच लोखंडी तुळयाचे पेंटीग करण्यात येणार आहे. ई टेंडरींग द्वारे निविदा भरण्याची अंतीम तारीख २३ एप्रिलला. सकाळी १० वाजेपर्यंत होते..कंत्राटदार दाराने निविदा स्विकारल्यानंतर लगेच कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.२००४ यध्ये या बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते गेली १६ वर्षे एकदाही बसस्थानकाची डागडुजी करण्यात आली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

 गेली दोन वर्षे बसस्थानकाच्या छप्पराला वाऱ्याने उडाल्याने छप्पराला गळती लागली आहे.गेल्या पावसाळ्यात छप्पराला गळती लागल्याने बसस्थानकावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या.यावेळी उपसभापती व काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडीस यांनी कदंबा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना काणकोणात बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली होती.त्यावेळी एक-दोन महिन्यात बसस्थानकाची दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले होते.सद्या कोविड-१९ चा पादुर्भाव असून बसस्थानकाची पावसाळ्यातील दुरावस्था थांबण्यासाठी उपसभापती इजिदोर फर्नाडीस यांनी तातडीच्या कामाची निविदा काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

बसस्थानकाच्या आतल्या व बाहेरच्या बाजूला बारा पेक्षा जास्त दुकाने आहेत.त्याशिवाय केन्टिन व नागरीक सुविधा केंद्र,वाहतूक खात्याचे कार्यालय आहे.गेल्या पावसाळ्यात या सर्वानाच गळतीमुळे त्रास सहन करावे लागले होते. बसस्थानकाची दुरुस्ती करण्यासाठी निविदेमध्ये कंत्राटदाराला पावसाळ्यासह २७० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मात्र पावसाळ्या पूर्वी छप्पराची दुरूस्ती करणे गरजेचे आहे ही अट निविदेमध्ये नाही त्यामुळे या पावसाळ्यात बसस्थानकाची परिस्थिती काय होईल  हे सांगता येत नाही.

दरम्यान, पोलिसांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली.

 

Goa Goa Goa

संबंधित बातम्या