बांधकाम क्षेत्रात लगबग सुरू

Dainik Gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

टाळेबंदीत पूर्पपणे ठप्प झालेल्या बांधकाम व्यवसायाचे निर्बंध शिथिल करून निदान तातडीची कामे पूर्ण करण्याची परवानगी देण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांनी सरकारकडे केली होती.

मडगाव,

महत्वाची भूमिका बजावणाऱ्या, पण टाळेबंदीतील निर्बंधामुळे मृतवत झालेला बंधकाम व्यवसाय निर्बंध हटवल्यानंतर हळूहळू गती घेत असून काही ठाकणी कामेही सुरू झाली आहेत. बहुतेक ठिकाणी तातडीची असलेली मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आल्याने कामगारांची लगबग दिसू लागली आहे.
टाळेबंदीत पूर्पपणे ठप्प झालेल्या बांधकाम व्यवसायाचे निर्बंध शिथिल करून निदान तातडीची कामे पूर्ण करण्याची परवानगी देण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांनी सरकारकडे केली होती. २० तारखेपासून सरकारने निर्बंध शिथिल करून कामगारांच्या आरोग्याच्या सुरक्षेची उपाययोजना करून कामे सुरू करण्याची परवानगी बांधकाम व्यवासयिकांना दिली आहे. त्यासाठी पालिका व पंचायतींकडून परवानगी घेण्याची अट बांधकाम क्षेत्राला लागू करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक सोमवारपासून पालिका व पंचायतींकडून परवाना मिळवण्याच्या कामाला लागले आहेत. कुडचडे, म्हापसा, मडगाव पालिकेसह काही ग्राम पंचायतींनी बांधकामासाठी परवाने दिले आहेत. बांधकाम व्यवसायिक परवान्यासाठी नलाईन अर्ज भरत आहेत, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डॉ. देश प्रभुदेसाई यांनी दिली.
टाळेबंदीत आलेली मरगळ झटकून बांधकाम क्षेत्रात थोडीफार लगबग दिसू लागली आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांचे अस्तित्व जाणवू लागले आहे, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या