कोरोना रुग्‍णांना मानसिक बळ देतेय ‘संगथ’

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

टेलि-सायकायट्रीद्वारे उपचार व सल्ला : विदेशातील राष्‍ट्रांनीही निवडली उपचारपद्धती

प्राची नाईक

पणजी, 

ग्लोबल इनोव्हेशन एक्सचेंजने गोव्यातील पर्वरी येथील ‘संगथ’ या संस्थेच्या टेलि-सायकायट्री (तंत्रज्ञानाच्या साह्याने दूरवरून मानसोपचार) संशोधन प्रकल्पाची जगभरातील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये मानसिक आजारावर उपचार प्रणालीसाठी निवड केली आहे. 
हा प्रकल्प अनेक आरोग्य सेवा कार्यकर्त्यांचे कामाचे ओझे कमी करतो. इमप्रूविंग अॅक्सेस थ्रू टेलि-सायकायट्री ( इम्पॅक्ट) असे या प्रकल्पाचे नाव असून हा संशोधन प्रकल्प प्रा. रिचर्ड वेलेमन, डॉ. अभिजित नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली २०१७ साली सुरू करण्यात आला होता.
 ग्लोबल इनोव्हेशन एक्सचेंजने ‘कोविड -१९’ इनोव्हेशन हबची स्थापना केली आहे. जिथे ‘संगथ’ या संस्थेच्या ‘इम्पॅक्ट’ इंडिया प्रकल्पाचा उपचारप्रणालीत वापर केला आहे. ‘इम्पॅक्ट’ची टेलिमेडिसिन मॉडेल म्हणून निवड केली गेली आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने विशेषतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दूरवरून मानसोपचार केले जात असल्यामुळे ‘कोविड-१९’च्या दरम्यान सामाजिक अंतर पाळून रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेऊ शकतो.
‘संगथ’च्या शोध गटाने डिचोली, पेडणे आणि साखळी या सारख्या सहा शहरांतल्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर टेली-मेडिसिन प्लॅटफॉर्म उभारून लॅपटॉप सारख्या मूलभूत सुविधांसह आणि एक समुपदेशकांची नेमणूक केली आहे. मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. रवींद्र अग्रवाल हे त्यांच्या कार्यालयातच बसून रुग्णांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तपासणी करतात. 

कसे चालते काम....
जेव्हा रुग्ण स्थानिक आरोग्य केंद्रात येतो, त्यावेळी समुपदेशक रुग्णाचे तपासणी व संशोधन सत्र सुरू करतात. जेव्हा हे सत्र संपते, तेव्हा टेलि-सायकायट्री पोर्टलातून मानसोपचार तज्ज्ञांमार्फत दिली गेलेली औषधे, योजना छापून रुग्णाला देण्यात येते. 
----
कोट करणे
टेलिसायकियाट्री आणि टेली-मेडिसिन मॉडेल सार्वजनिक आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांवर होणारा भार कमी करू शकते, विशेषत: अशा साथीच्या आजाराच्या वेळी, रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही.
- डॉ. अभिजित नाडकर्णी.

संबंधित बातम्या