‘डायमंड प्रिन्सेस’ जहाजावरील हे प्रवाशी सुरक्षित

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

गोमंतकीयांना कोरोनाची लागण नाही.
ॲड. नरेंद्र सावईकर : जहाजातील गोमंतकीय सुरक्षित

हे जहाज चीनकडून जपानकडे निघाले होते. त्यावरील प्रवासी व खलाशांना जपानने विलग कक्षात ठेवले असल्याची माहिती आता उपलब्ध झाली आहे.

पणजी : जपानलगतच्या समुद्रात अडकलेल्या ‘डायमंड प्रिन्सेस’ या जहाजावरील गोमंतकीय सुरक्षित आहेत. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याची माहिती अनिवासी गोमंतकीयांसाठीचे आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी आज दिली. दरम्यान, गोमंतकीयांनी चीनचा दौरा करू नये, अशी सूचना राज्य सरकारने आज जारी केली.

ॲड. सावईकर म्हणाले, माझ्या माहितीनुसार ४५ ते ५० गोमंतकीय त्या जहाजावर आहेत. काहीजण खलाशी व काही प्रवासी आहेत. काहींच्या कुटुंबियांशी मी बोललो आहे. त्यांची नावे प्रसिद्ध करणे योग्‍य होणार नाही. पण, त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. जकार्ता जपान येथील भारतीय वकिलात साऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. येत्या दिवसांत त्यात जहाजावरील भारतीयांना (ज्यात गोमंतकीयांचाही समावेश असेल) सुरक्षितपणे भारतात आणले जाणार आहे.

मात्र, त्यात किती गोमंतकीय आहेत याची निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही. याबाबत सावईकर म्हणाले, आमचे आयुक्तालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात आहे. दोनच दिवसांपूर्वी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी जपानमधील वकिलातीला त्या जहाजावरील भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

 

 

 

 

अनमोल जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळा

संबंधित बातम्या

फोटो फीचर