कोरोनाच्या प्रभावाने चिकनचे दर घसरले!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजीः जगभरात कोरोना विषाणूंच्या बातम्यांनी झोप उडविली आहे. देशातही ३९ रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुरवातीच्या काळात चिकनमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्याचे म्हटले असल्याने लोकांमध्ये काही प्रमाणात चिकनविषयी भीती निर्माण झाली आहे. चिकनची पूर्वीपेक्षा मागणी कमी होऊ लागली असून १४० रुपये किलोने विकले जाणारे चिकनचे प्रती किलोचे दर पणजीत १२०, तर म्हापशात ११० रुपयांवर आले आहेत.

कोरोना विषाणूमुळे देशात समूहाने राहू नका, असे सरकारने बजावले आहे. त्यामुळे एका बाजूला सण उत्सवावरही कोरोना विषाणूचे सावट आहे. त्याचबरोबर चिकनविषयी सुरवातीच्या काळात आलेल्या बातम्यांचा प्रभाव चिकन व्यवसायावर झाला आहे. चिकन खरेदी पूर्वीसारखी होत नसल्याचे बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. अल्ताफ या चिकन विक्रेत्याने सांगितले की, कोरोनाच्या प्रभावामुळे ग्राहक कमी झाला आहे. आता चिकनचे दरही २० रुपयांनी उतरले आहेत. १४० रुपये किलो असलेले चिकन आता १२० रुपये किलोने विकले जात आहे. मात्र, अंड्यांच्या दरात काही फरक पडलेला नाही. ४८ रुपये डझन अंडी विक्री होत असून एक अंडे पाच रुपयांना विकले जात आहे.

अंड्याच्या खरेदीत कोणतीही घट झालेली नाही. याउलट महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंड्याच्या दरात मात्र मोठी घसरण झाल्याचे वृत्त आहे. पाच ते सहा रुपयाला विकले जाणारे अंडे आता दोन रुपयाला विकले जात आहे आणि हा सर्व कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याचे तेथील कुकुटपालन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गोव्यातही काही प्रमाणात कुकुटपालन व्यवसाय होतो, पण येथील बॉयलर कोंबड्यांची आणि अंड्यांची मागणी शेजारील राज्यातील कुकुटपालन व्यावसायिकच पूर्ण करतात.
 
संबंधित बातम्या