कोरोनासाठी आरोग्यमंत्र्यांनी घेतली खास बैठक

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

‘कोरोना’ व्हायरसबाबत राज्यात सतर्कता : आरोग्यमंत्री

आरोग्य खाते, अन्न व औषध प्रशासन खात्याच्या बैठकीत दिली माहिती

आरोग्य खाते, अन्न व औषध प्रशासन खात्याच्या बैठकीत बोलताना आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे. सोबत आलोक सक्‍सेना, गगन मलिक, नीला मोहनन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. जोस डिसा व मान्यवर.

पणजी : राज्‍यात चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्‍यात आली आहे.कोरोना व्‍हायरसचा प्रसार राज्‍यात होऊ नये म्‍हणून शक्‍य ते सर्व प्रयत्‍न आरोग्‍य खात्‍याने केलेले आहेत. या प्रयत्‍नांमुळे राज्‍यात या व्‍हायरसचा प्रसार झालेला नसल्‍याची माहिती आरोग्‍य मंत्री विश्‍‍वजित राणे यांनी दिली.

देशभरातील सर्व राज्‍यांत कोरोना व्‍हायरस पसरू नयेत म्‍हणून तेथील राज्‍यशासन तसेच केंद्र सरकारकडून सर्तकता बाळगली जात आहे. याच धर्तीवर केंद्रीय आरोग्‍य खात्‍याचे सचिव आलोक सक्‍सेना, विमानतळ सहाय्‍यक प्राधीकरणाचे संचालक गगन मलिक, गोवा आरोग्‍य खाते,गोवा राज्‍य अन्‍न आणि औषध प्रशासन खाते तसेच इतर खात्‍यांच्‍या प्रतिनिधींच्‍या उपस्‍थितीत बैठक घेण्‍यात आली.
कोरोना व्‍हायरसचा फैलाव रोखण्‍यासंदर्भात राज्‍य सरकारने केलेल्‍या उपाययोजनांची पडताळणी यावेळी घेण्‍यात आली.

या बैठकीला आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे, आरोग्‍य खात्‍याच्‍या सचिव नीला मोहनन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर,आरोग्‍य खात्‍याचे संचालक डॉ. जोस डिसा आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

अबब : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकही उमेदवार इच्छुक नाही.

म्हणूनच देशात ‘कोरोना’ नाही..!
आपल्‍या देशाची लोकसंख्‍या १३० कोटी सुमारास आहे. तरीही कोरोनाच्‍या व्‍हायरसला देशात आम्‍ही प्रवेश करू दिलेला नाही. केंद्र सरकारने दिलेल्‍या सुचनांचे प्रत्‍येक राज्‍य सरकारने पालन केलेले असून, यामुळेच आपल्‍याला हे करणे शक्‍य झाले आहे. आज गोव्‍यात झालेली बैठक ही राज्‍य सरकारने केलेल्‍या तयारीची पडताळणी घेण्‍यासाठी होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य खात्‍याचे सचिव आलोक सक्‍सेना यांनी दिली

संबंधित बातम्या