‘कॉस्ता व्हिक्‍टोरिया’ पर्यटक जहाज गोव्यात दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

२७२१ पर्यटकांचे आगमन; सागरी पर्यटन हंगामातील २२ वे जहाज

दाबोळी:  कॉस्ता व्हिक्‍टोरिया हे विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज कोलंबोमार्गे मुरगाव बंदरात २७८१ देशी - विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले आहे. सागरी पर्यटन हंगामातील हे २२ वे आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज आहे.

सागरी पर्यटनांतून पर्यटकांचा गोव्यात ओघ चालूच असून आजपर्यंत २२ आंतरराष्ट्रीय विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाली. मे. जे. एम. बक्‍सी व इनकॅप सिपिंगच्या माध्यामातून हे जहाजे गोव्यात दाखल होत असून आजचे कॉस्ता व्हिक्‍टोरिया पर्यटक जहाज, इनकॅप शिपिंगच्या माध्यमातून दाखल झाले आहे. कोलंबोमार्गे दाखल झालेल्या या जहाजातून १९८२ प्रवासी व या जहाजावरील ७९९ कर्मचारी मिळून २७८१ देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. यात आस्ट्रेलिया, जर्मनी, स्वीझर्लंड, कोलंबिया, भारत आदी राष्ट्रातील पर्यटक दाखल झाले. आज दिवसभर गोव्याच्या पर्यटन श्रृष्टीचा आनंद लुटल्यानंतर पर्यटकांनी परत मुरगाव बंदर गाठून जहाजात प्रस्थान केले. नंतर हे जहाज पर्यटकांना घेऊन मुंबईला रवाना झाले.

संबंधित बातम्या