प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे व्याख्यानमाला

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या महोत्सवात
आजपासून सरिता राठी यांची व्याख्याने

पणजी ः प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयातर्फे ८४व्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त कांपाल-पणजी येथे दयानंद बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या अध्यात्मिक व्याख्यानमालेला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

सोमवारी २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्यातील वरिष्ठ ध्यान शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता राठी या ‘क्रिएटिंग मिरॅकल्स इन लाईफ’, ‘रिसिव्हींग गॉड्‌स पावर’ व ऍट पार्वस ऑफ सक्सेस’ या विषयावर व्याख्याने देणार आहेत. यानिमित्ताने त्यांचे मौलीक मार्गदर्शन लाभणार असल्याने लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी गोवाच्या प्रमुख शोभा बेहन यांनी केले आहे. ‘नैराश्‍य’ प्रबोधनात्मक व्याख्यानमालेची मूळ संकल्पना आहे.

 

 

 

जीवनातील समस्यांकडे आव्हान म्हणून पहा : डॉ. पटेल

संबंधित बातम्या

फोटो फीचर