प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणातील संशयित ताहीर इसानीची जबानी नोंद

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या संशयित विल्सन गुदिन्हो याला पोलिसांनी जबानीसाठी बोलविले नाही. या प्रकरणातील या दोघांची भूमिका तपासून पाहत आहेत. जमीन मालमत्तेवरून ही घटना घडल्याच्या प्राथमिक तपासता आढळून आले असल्याची माहिती सूत्राने दिली.

पणजी : मेरशी पंच प्रकाश नाईक याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी क्राईम ब्रँचने आज ताहीर इसानी याची जबानी नोंद केली.

प्रकाश नाईक याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबालईवरून प्रकाश नाईक ग्रुपच्या व्हॉटस्अपवरून मेसेज पाठविली होती. त्यामध्ये त्याने विल्सन गुदिन्हो व ताहीर या दोघांकडून होणाऱ्या सतावणुकीला तसेच ब्लॅकमेलमुळे आत्महत्या करत आहे असे नमूद केले होते. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी प्रथमदर्शनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर प्रकाश याची बहीण अक्षया गोवेकर हिने आपल्या भावाला आत्महत्या करण्यास विल्सन गुदिन्हो व ताहीर याने भाग पाडल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार जुने गोवे पोलिसांनी या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीआयडी क्राईम ब्रँचकडे देण्यात आल्यानंतर बरीच माहिती पोलिसांना तपासात समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील हे करत आहेत. हल्लीच गोवा खंडपीठाने संशयित विल्सन गुदिन्हो याला अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिसांनी तपासात सर्व बाजूने चौकशी सुरू केली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संशयित गुदिन्हो हे शरण येतील असे पोलिसांना वाटत होते मात्र ते गेलेले नाहीत.

सध्या त्यांच्याविरुद्धचे पुरावे जमा करण्यासाठी दुसरा संशयित ताहीर इसानी याला समन्स पाठवून जबानी नोंद केली आहे. त्याच्या जबानीतून काही नवी माहिती समोर आली आहे. प्रकाश नाईक यांनी केलेल्या जमीन मालमत्तेप्रकरणीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासकामाने वेगळी वळण घेतले आहे.

 हेही वाचा : अतिरेक्याच्या संशयावरून अटकेतील समीर सारदानाची खंडपीठात याचिका

संबंधित बातम्या