शिवोली येथे ५.४ लाखांचा ड्रग्ज जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी:कोकेन व एलएसडीचा समावेश नायजेरियन संशयिताला अटक
वाडी - शिवोली येथे पहाटेच्या सुमारास स्कुटरवरून संशयास्पद फिरणाऱ्या नायजेरियन ओनिईनयेची ईनियईन्नया आरुंग्वा ऊर्फ पीटर (३७) याला क्राईम ब्रँचने आज अटक केली.त्याच्या स्कुटरमध्ये लपविलेला ५ लाख ४० हजारांचा एलएसडी व कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आला. त्याची स्कूटरही ताब्यात घेण्यात आली असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

क्राईम ब्रँच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोलिस खबऱ्यांकडून शिवोली येथे ड्रग्जची विक्री रात्री उशिरापर्यंत केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचे पथक काल रात्री किनारपट्टी भागात गस्तीवर होते. शिवोली येथून एक विदेशी नागरिक
स्कुटरवरून येताना दिसला. त्याला थांबवून त्याची तसेच गाडीची झडती घेण्यात आली. या झडतीममध्ये ४८.३० ग्रॅम एलएसडी पेपर्स व ०.१२ ग्रॅम कोकेन सापडले. हा ड्रग्ज घेऊन तो रात्रीच्यावेळी ग्राहक शोधत होता. त्याने हा ड्रग्ज कोठून आणला त्याची माहिती उपलब्ध केली नाही.
संशयित हा हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. यापूर्वी त्याला कळंगुट पोलिसांनी त्याला अटक केली. बेकायदेशीर वास्तव्य व बनवेगिरीप्रकरणीचा गुन्हा त्याच्यावर २०१६ मध्ये नोंद झाला आहे. तो २०१५ मध्ये गोव्यात आला होता. न्यायालयात खटला सुरू असल्याने तो जामिनावर आहे. जामिनावर असताना तो ड्रग्ज व्यवसायात गुंतलेला होता. पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेल्या पथकामध्ये निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर, हवालदार अशोक गावडे, कॉन्स्टेबल कल्पेश तोरस्कर, उदेश केरकर यांचा समावेश होता.

भाजप सरकारवर टीका

संबंधित बातम्या