भाजप सरकारवर टीका   

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी:इतिहासाच्या पुस्तकात सार्वमतदिनाचा समावेश व्हावा: विजय सरदेसाई
सार्वमतदिन हा ऐतिहासिक क्षण आहे. शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या पुस्तकात या दिनाचा समावेश व्हावा, अशी आपली इच्छा आहे. कोकणीच्या नववीच्या पुस्तकात मनोहर पर्रीकरांमुळे हा इतिहास आला आहे, पण इतिहासाच्या पुस्तकांतही या दिवसाचे महत्त्व अभ्यासाला येईल की नाही, ही शंका आहे. कारण राज्यातील सरकार हे विलिनीकरणवादी सरकार असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

मेरशी जंक्शन येथे उभारलेल्या जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्यासभोवतालच्या चौथऱ्याचे उद्‍घाटन आणि नामकरण प्रसंगी सरदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, आमदार टोनी फर्नांडिस, फादर ब्रिटो फुर्तादो, डॉ. लिली, सरपंच रुफिना क्वॉद्रुस, मेरशीच्या कोकणी कला केंद्राचे अध्यक्ष सॅबस्टेव फर्नांडिस यांची उपस्थिती होती.
सरदेसाई म्हणाले की, राज्यात गोवा मुक्तीदिन, घटकराज्यदिनाप्रमाणे सार्वमतदिनसुद्धा महत्त्वाचा आहे. राज्य सरकारला या दिवसाचा विसर पडला आहे. या सरकारातील केवळ तीन आमदार या दिनाच्या शुभेच्छा देतात आणि इतर २४ जणांना त्याचा विसर पडतो. सार्वमतदिन हा महत्त्वाचा दिवस असून साधी एक जाहिरातसुद्धा राज्य सरकार देऊ शकत नाही, यावरून सरकारला गोव्याची अस्मिता सांभाळायची आहे की नाही. राज्य महाराष्ट्रात विलीन झाले असते, तर सध्याचे मुख्यमंत्री जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष झाले असते, अशी टीकाही त्यांनी केली. याप्रसंगी आमदार फर्नांडिस यांनी सांगितले, की या चौथऱ्याच्या बाजूने जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे सुशोभिकरणाचे काम आपण करून देऊ. आपल्या मतदारसंघात निर्माण केलेल्या या स्थळाबद्दल त्यांनी कला केंद्राचे आभार मानले. याप्रसंगी फा. फुर्तादो यांनी आपले मत व्यक्त केले.

‘बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभा परिसरात
जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारून दाखवावा’
आम्ही जेव्हा सरकारात होतो, तेव्हा जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा परिसरात उभारण्यासाठी आग्रह धरला होता. पुतळा उभारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. परंतु तत्कालीन विरोधी पक्षात असणारे आणि पक्षांतर केलेल्या दहाजणांनी पुतळ्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगत सरदेसाई यांनी त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे खांब असलेले आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पुतळा उभारून दाखवावा, असा चिमटाही काढला.

सावर्डेत बेकायदेशीर उत्खननावर कारवाई

संबंधित बातम्या