असंतुलित वातावरणामुळे बागायतीच्‍या ७० टक्‍के नुकसानाची शक्‍यता

Dainik Gomantak
बुधवार, 8 जानेवारी 2020

तेजश्री कुंभार, 
पणजी, 

काजु आणि आंबा पिकांच्‍या झाडांसाठी मोहोर येण्‍याचा काळ डिसेंबर आणि जानेवारी हा महिना होय. या काळात या झाडांना फलधारणा होत असल्‍याने योग्‍य वातावरण असणे अत्‍यंत महत्त्‍वाचे असते. सध्‍याच्‍या वातावरणात ढगाळ वातावरणासह पावसाच्‍यासरी कोसळण्‍याचे प्रमाण वाढत आहे. अशाप्रकारचे असंतुलित वातावरण बागायतीसाठी घातक असून पुढील एक महिना वातावरणाचा कल असाच राहिला तर बागायतीचे ७० टक्‍के नुकसान होण्‍याची शक्‍यता कृषी खात्‍यातील तज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे. 

काजू आणि आंबा हि गोव्‍यात घेतली जाणारी दोन महत्त्‍वाची बागायती पिके आहेत. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्‍यात पडणार्‍या थंडीमुळे या झाडांवर मोहोर येण्‍यास मदत होते. थंडी कमी पडली अथवा पावसाच्‍या सरी कोसळल्‍या तर झाडांना मोहोर कमी प्रमाणात येतो शिवाय तो गळून पडण्‍याची अथवा त्‍याला किड लागण्‍याची मोठी शक्‍यता असते. टि‍मॉस्‍कीट्यू नावाची कीड ढगाळ वातावरणामुळे माहोरावर सर्रास पडल्‍याचे पहायला मिळते. ज्‍यामुळे शेतकर्‍याला लाखो रूपयांचा तोटा होउ शकतो.  
काजू आंब्‍यावर पडणारी टी मॉस्क्विटो हा लालसर भुरकट रंगाचा किडा असून झाडाची नवीन पालवी आणि मोहोर कोवळा असताना या किडीचा उपद्रव होतो. या किडीच्या अळ्या तसेच प्रौढ कीड हे दोन्ही झाडाच्या कोवळ्या फांद्या, मोहोर आणि लहान फळे यामधील रस शोषून घेतात. किडीचा उपद्रव झालेला भाग किडीने पेशी खाल्ल्यामुळे खोलगट बनतो. हा भाग नंतर कोरडा होऊन फांद्या, मोहोर आणि फळे जळून जातात. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाल्यास सर्व झाडच जळून गेल्यासारखे दिसते.

किडीपासून बचावासाठी उपाय करण्‍यासाठी खालील उपाय करावेत असा सल्‍ला कृषी खात्‍याचे उपसंचालक किशोर भावे यांनी दिला. 
१)झाडांना योग्‍य पाण्‍याची सोय केल्‍यास किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवेल 
२)१ लीटर पाण्‍यात ५.८ मीलीलीटर नीमऑइल टाकून फवारणी करावी.
३)एक लीटर पाण्‍यातून लेमडासायहेलोथ्रीन केमीकलची ०.५ मीलीलीटर मिसळून फवारणी करावी. 

राज्‍यातील नोंदणीकृती शेतकरी - सुमारे ३८ हजार 
काजू पिकाचे क्षेत्रफळ - ५६ हजार हेक्‍टर 
आंबा पिकाचे क्षेत्रफळ - ५ हजार हेक्‍टर 

संबंधित बातम्या