‘वनजमापे’कडून १.७३ कोटीचा माल जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:मुरगाव, झुआरीनगर येथे कारवाई : मद्य बाटल्या, ट्रक सुटे भागांचा समावेश
वजनमापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकून कायद्याचे उल्लंघन केलेल्या झुआरीनगर येथील सांकवाळ औद्योगिक वसाहतीमधील आस्थापनात तसेच मुरगाव येथील आस्थापनांविरुद्ध कारवाई केली व सुमारे १ कोटी ७३ लाखांचा माल जप्त केला.जप्त केलेल्या मालामध्ये मद्याच्या बाटल्या, ट्रकांचे सुटे भाग यासह अन्‍य वस्‍तूंचा समावेश असल्‍याची माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांकवाळ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका आस्थापनामध्ये सीलबंद मद्याच्या बाटल्यांची तपासणी करण्यात आली. ७५० मिलीलिटर रम बाटल्यांमध्ये सरासरी सुमारे २० मिलीलिटर रम मद्य कमी असल्याचे तपासणीत आढळून आले.त्यामुळे तेथील ४२०० मद्याच्या बाटल्‍या जप्त करण्यात आल्या.त्याची किंमत सुमारे २१.५ लाख रुपये आहे.
मुरगाव येथील मेटास्ट्रीप कॉम्प्लेक्समध्ये घालण्यात आलेल्या छाप्यात नामांकित ट्रकांचे सुटे भाग जप्त करण्यात आले.त्यामध्ये सिलिंग रिंग रिटेनर व रेडियल शाफ्ट सिलिंग याचा समावेश आहे.या सीलबंद सुटे भागाच्या पॅकेट्सवर उत्पादनाची तारीख तसेच वर्ष याचा उल्लेख नव्हता.हे सुटे भाग कोणत्या देशातील आहेत, याचीही माहिती नव्हती.त्यामुळे या आस्थापनातून ३७ बॉक्‍सेस जप्त करण्यात आले.त्याची किंमत २२ हजार रुपये आहे.याच परिसरात तीन प्रकरणे नोंदण्यात आली आहेत.त्यामध्ये आस्थापनांकडून वापरण्यात येत असलेली वजनमापे ही खात्याकडून प्रमाणित करून घेण्यात आली नसल्याचे आढळून आले.त्यामुळे या तीनही आस्थापनांविरुद्ध कारवाई केल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील ही संयुक्त कारवाई एकाचवेळी खात्याचे प्रमुख प्रसाद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर यांनी सुधीर गांवकर, पास्कोल वाझ व गुरुनाथ नाईक यांच्या साहाय्याने केली.

तेरेखोल पूल बांधकामाचा मार्ग मोकळा​
थिवीतही कारवाई
थिवी येथील औद्योगिक वसाहतमध्ये वजनमापे अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला.या आस्थापनामध्ये ब्रँडीच्या सीलबंद बाटल्यांचे बॉक्‍सेस ठेवण्यात आले होते.या मद्याच्या बाटल्या विविध क्षमतेच्या होत्या.त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये सरासरी सुमारे ४.५ मिलीलिटर मद्य कमी असल्याचे आढळून आले.त्यामुळे तेथील ४२ हजार मद्याच्या पॅकेजिस जप्त करण्यात आल्या आहेत.त्याची किंमत सुमारे १ कोटी ५१ लाख रुपये आहे.या सर्वांविरुद्ध वनजमापे कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या