सागरी पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात

Dainik Gomantak
बुधवार, 15 जानेवारी 2020

प्रदीप नाईक
दाबोळी

प्रदीप नाईक
दाबोळी

यंदाच्या सागरी पर्यटन हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात २ जानेवारीला ‘कॉस्ता विक्‍टोरीया’ या विदेशी पर्यटक जहाजाद्वारे झाली आहे. त्यामुळे मुरगाव बंदरात विदेशी पर्यटक जहाजे दाखल होत असून, सागरी पर्यटनातील दुसऱ्या टप्प्यातील दुसरे ‘सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन’ हे विदेशी पर्यटक जहाज मुरगाव बंदरात तीन हजार देशी-विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले.
दुसऱ्या टप्प्यात सागरी पर्यटनातून मे. जे. एम. बक्‍सी या कंपनीच्या माध्यमातून १६ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे तर इनकॅप शिपिंग कंपनीच्या माध्यामातून १० विदेशी पर्यटक जहाजे मिळून एकूण २६ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. एकूण ४३ हजार ५८७ देशी-विदेशी पर्यटक या जहाजातून गोव्यात दाखल होणार आहेत. मुंबई-गोवा-मुंबई अशा ‘कार्निका’ या देशी पर्यटक जहाजाच्या २० फेऱ्या मुरगाव बंदरात होणार आहेत. यात अंदाजे २५ हजार देशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहे. एकंदरीत ६८ हजार ५७८ पर्यटक गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत.
सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी जगभर गोवा प्रसिद्ध राज्य आहे. प्रत्येक देशातून येणारा पर्यटक गोव्याच्या या समुद्र किनाऱ्यांना भेट देतो. चविष्ट स्थानिक पदार्थ उपलब्ध असणारी रेस्टॉरंट यामुळे बरेच पर्यटक गोव्याकडे आकर्षित होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. तसेच सागरी पर्यटनातून पर्यटक संख्याही विक्रमी ठरत आहे.
२०१७-२०१८ मधील सागरी पर्यटन हंगामात एकूण ३० पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होऊन यातून एकूण ६३ हजार ३०० देशी-विदेशी पर्यटक जलमार्गे गोव्यात दाखल झाले होते.
२०१८-२०१९ या वर्षाच्या सागरी पर्यटनातून एकूण ४० विदेशी पर्यटक जहाजे दाखल होऊन यातून सुमारे ७० हजारांहून हजारांहून अधिक पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. गत साली मे. जे. एम. बक्‍सी यांच्या प्रायोजनखाली ही जहाजे दाखल झाली होती. यंदा त्यांच्या जोडीला इनकॅप शिपिंग ही कंपनी दाखल झाली असून, दोन्ही कंपनीच्या प्रयोजनाखाली एकूण ४१ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे दाखल होणार आहेत. पैकी पहिल्या टप्प्यात जेएम बक्‍सीच्या प्रायोजनाखाली आठ तर इनकॅप शिपिंगच्या माध्यमातून सहा मिळून एकूण १४ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे दाखल झाली तर आता दुसऱ्या टप्प्यात जे. एम. बक्‍सीच्या माध्यमातून १६ तर इनकॅप शिपिंगच्या माध्यमातू १० विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे मिळून एकंदरीत २६ विदेशी पर्यटक जहाज मे २०२० पर्यंत दाखल होणार आहेत.
२०२० सालात दाखल होणारी जहाजे व पर्यटकची संख्या

दिनांक प्रवासी कर्मचारी जहाजाचे नाव

१६ जानेवारी १९०० ७६६ कॉस्ता विक्‍टोरीया
१९ जानेवारी १९० लाबेल्ले देस ओशियन
३० जानेवारी २६६६ कॉस्ता विक्‍टोरीया
२५ जानेवारी २०३४ ३०३३ सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन

१३ फेब्रुवारी २६६६ कॉस्ता विक्‍टोरीया
१३ फेब्रुवारी ७६० ३३५ बौडिक्का
१९ फेब्रुवारी २५०० १०३० बौडिक्का
२४ फेब्रुवारी २००० ९९९ सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन
२८ फेब्रुवारी १२०० ४०० मार्को पोलो
९ मार्च २००० ९९९ सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन
१२ मार्च २००० १००० नार्वेडीन जडे
२५ मार्च ५३६ ३०० अल्बाट्रोज
३१ मार्च ७०० ४०० सेव्हनसीज मरीनर
१ एप्रिल १४०० ५०० विकींग सन
५ एप्रिल १८३० ७२० मरेल्ला डिस्कव्हरी
८ एप्रिल १२६६ ४२६ आयडाविटा
९ एप्रिल ४९० ३५० सेव्हनसीज व्होलजर
९ एप्रिल २८०० ११०० कॉस्ता डेलिझेओसा
११ एप्रिल २५०० ६०० 'आयडा बेला'
१६ एप्रिल ९६० ६०० आसुका-२
८ मे ७७७ ३७३ इन्सीगनीया
१४ मे ६८४ ३७० नौटिका

संबंधित बातम्या