गोवा विज्ञान महोत्‍सवाचा समारोप

Dainik Gomantak
शनिवार, 18 जानेवारी 2020

पणजी, 
गोवेकरांना फायदा होईल अशा महोत्‍सवांना आधार देण्‍यासाठी ईएसजीचा नेहमीच पुढाकार असतो शिवाय आम्‍ही तसे सहाय्यही करतो.  करमणूक व चित्रपटांच्‍या माध्‍यमातून विज्ञानाचे ज्ञान प्रसारित केले जाऊ शकते आणि या बाबी मुलांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. ईएसजी आणि गोवा सरकार अशा महोत्‍सवांना प्राधान्य देत आहेत, याबद्‍दल मला फार आनंद होत आहे आणि आम्ही भविष्‍यातही असे आयोजन करत राहू, असे मत गोवा मनोरंजन संस्‍थेचे उपाध्‍यक्ष सुभाष फळदेसाई यांनी व्‍यक्‍त केले. 

पणजी, 
गोवेकरांना फायदा होईल अशा महोत्‍सवांना आधार देण्‍यासाठी ईएसजीचा नेहमीच पुढाकार असतो शिवाय आम्‍ही तसे सहाय्यही करतो.  करमणूक व चित्रपटांच्‍या माध्‍यमातून विज्ञानाचे ज्ञान प्रसारित केले जाऊ शकते आणि या बाबी मुलांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. ईएसजी आणि गोवा सरकार अशा महोत्‍सवांना प्राधान्य देत आहेत, याबद्‍दल मला फार आनंद होत आहे आणि आम्ही भविष्‍यातही असे आयोजन करत राहू, असे मत गोवा मनोरंजन संस्‍थेचे उपाध्‍यक्ष सुभाष फळदेसाई यांनी व्‍यक्‍त केले. 
विज्ञान परिषदेतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या पाचव्‍या विज्ञान महोत्‍सवाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर गोवा हाऊसिंग बोर्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष. आमदार सुभाष शिरोडकर, गोवा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि गोवा विद्यापीठाच्या गोवा बिझिनेस स्कूलचे डिन  प्राध्यापक व्हीव्ही कामत, सेंट्रल कोस्‍टल ॲग्रीकल्‍चरल रिसर्च इन्‍स्‍टीट्यूट, जुने गोवाचे संचालक डॉ. एकनाथ चाकुरकर आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. 
भारत सरकारचे विज्ञान प्रसार (डीएसटी) चे संचालक डॉ. नकुल पराशर यांनी साय फी 2020 चे आयोजक आणि लघुपट स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "महोत्सवात आलेल्‍या मुलांची आवड पाहून आम्हाला फारच आश्चर्य वाटले. आमचे सरकार मुलांना शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. परंतु त्यांना अशा प्रकारचे महोत्सव त्‍यांच्‍या शिक्षणाला नवी दिशा देण्‍याचे काम करतात. अवघड विषयांच्‍या बाबतीत मुलांच्‍या मनातील भय कमी करण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो.  भावी पिढीमध्ये वैज्ञानिक ज्ञान वाढविण्यासाठी आणि या क्षेत्रात सुरू असणार्‍या शोधांची माहिती मुलांपर्यंत पोहचावी म्‍हणून साय फी सारखे महोत्‍सव महत्त्‍वाची भूमिका बजावतात.
सुभाष शिरोडकर यांनी समारोप सोहळ्यात बोलताना आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हणाले की, जगात नावलौकीक करू इच्‍छिणार्‍या गोव्याच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे अनेक प्रकारचे कौशल्‍य आणि योग्यता निर्माण करणारे महोत्सव आयोजित केले जावेत. भविष्‍यातील गरज लक्षात घेता विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणाची पातळी सुधारण्याची गरज असल्‍याचेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
गोव्‍यात होणार्‍या प्रत्‍येक महोत्‍सवानंतर दरवर्षी आपण स्वत: ला सुधारण्याचा आणि अधिकाधिक चांगल्‍या पध्‍दतीने महोत्‍सवाचे आयोजन करण्‍याचा प्रयत्न केला आहे. आम्‍ही केलेल्‍या निरीक्षणानुसार महोत्‍सवाला उपस्‍थित असणार्‍या विद्यार्‍थ्‍यांपैकी काहीजण नक्‍कीच विज्ञानाशी निगडीत असणार्‍या चित्रपट निर्मितीत भविष्‍यात प्रवेश करतील, आणि या विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या संस्थेचे उद्दीष्ट असल्‍याचे विज्ञान परिषद गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे म्‍हणाले. 
चार दिवस चाललेल्या या महोत्सवात ९,५०० हून अधिक प्रतिनिधींनी असे होते ज्यांनी चित्रपट पाहिले तसेच कार्यशाळांमध्ये आणि मास्टरक्लासेसमध्ये भाग घेतला आणि गोव्याच्या विविध संशोधन संस्थांच्या कामगिरी पुढे आणण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाला भेटही दिली.
या महोत्सवाच्या अत्‍यंत चांगल्‍या अशा नियोजनाचे विद्यार्थी व शिक्षकांनी कौतुक केले आणि पुढेही या महोत्‍सवात सहभागी होण्यासाठीची इच्छा व्यक्त केली.
साय फी २०२० च्‍या यावर्षीच्‍या विस्‍तारीत अहवालाचे वाचन साय फी २०२० चे आयोजन सचिव अभय भामईकर यांनी केले. 
विज्ञान परिषदेचे सचिव मनोहर पेडणेकर यांनी आभार व्‍यक्‍त केले. 

(बॉक्‍स करणे)
समारोप सोहळ्यामध्ये चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफी कार्यशाळेदरम्यान महोत्सवापूर्वी तयार करण्यात आलेल्या लघुपटांना बक्षिसे देण्यात आली होती. या स्‍पर्धेत प्रथम क्रमांक शारदा मंदिर हायस्कूलमधील कबीर नाईक यांच्या ‘कलयुग’ नावाच्या लघुपटाला, द्वितीय क्रमांकाला धेंपे कॉलेज ऑय आर्ट अँड सायन्‍सच्‍या रोशन सिंग यांची निर्मिती असलेल्‍या ‘द टाइम पॅरालॅक्स’ आणि तिसरा क्रमांक पुष्पक माशेलकर यांच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ या लघुपटांना प्राप्‍त झाला. इगनोरन्‍स....देअर इझ स्‍टिल टाइम या इस्‍माईल शेख आणि सोनिया च्‍यारी यांच्‍या सर्कव्हेंट या लघुपटांना यावेळी स्‍पेशल ज्‍युरी पुरस्‍कारही देण्‍यात आले. 

 
 

संबंधित बातम्या