पशुखाद्य किंमतीत केलेली दरवाढ मागे घ्यावी  

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पशुखाद्य दरवाढ मागे घेण्याबाबत
फेरविचाराचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

पणजी: गोवा डेअरीतर्फे पशुखाद्यच्या किंमतीत प्रति किलो चार रुपये केलेली दरवाढ मागे घ्यावी यासाठी आज दुग्ध शेतकऱ्यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली.या पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या किंमती कमी झाल्या असतील तर येत्या आठ दिवसांनी दरवाढीबाबत फेरविचार केला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून दुग्ध शेतकऱ्यांनी पशुखाद्याच्या किंमतीत केलेली वाढ मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून या शेतकऱ्यांनी ही दरवाढ मागे घेण्याची विनंती केली. पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या किंमती कमी झाल्याने ही दरवाढ रद्द करावी.

अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. सध्या या गोवा डेअरीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे.ही दरवाढ जर मागे घेतली तर गोवा डेअरीलाच नुकसान सोसावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी ही दरवाढ कमी करण्यासाठी अट्टाहास धरला आहे. त्यांनी पशुखाद्याच्या कच्च्या मालाची किंमत कमी झाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे, जर त्यामध्ये तथ्य असल्यास येत्या आठ दिवसात त्यावर सरकार फेरविचार करू शकतो असे या शेतकऱ्यांना सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या