पशुखाद्यावरील दरवाढ मागे घ्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

डिचोली:दूध संस्थांची मागणी अन्यथा डेअरीसमोर आंदोलनाचा इशारा गोवा डेअरीने पशुखाद्य दरात वाढ केली असून, डेअरीच्या निर्णयानुसार आजपासून(ता.१६) ही दरवाढ लागू होणार आहे. पशुखाद्यावरील या दरवाढीला डिचोली तसेच फोंडा तालुक्‍यातील दूध उत्पादक सहकारी संस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.दरवाढ मागे घेतली नाही,तर गोवा डेअरीसमोर आंदोलन करण्यात येईल,असा सणसणीत इशाराही या दूध उत्पादक संस्थांनी दिला आहे.

डिचोली:दूध संस्थांची मागणी अन्यथा डेअरीसमोर आंदोलनाचा इशारा गोवा डेअरीने पशुखाद्य दरात वाढ केली असून, डेअरीच्या निर्णयानुसार आजपासून(ता.१६) ही दरवाढ लागू होणार आहे. पशुखाद्यावरील या दरवाढीला डिचोली तसेच फोंडा तालुक्‍यातील दूध उत्पादक सहकारी संस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.दरवाढ मागे घेतली नाही,तर गोवा डेअरीसमोर आंदोलन करण्यात येईल,असा सणसणीत इशाराही या दूध उत्पादक संस्थांनी दिला आहे.
ही दरवाढ म्हणजे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांसाठी मारक असल्याची खंत विविध दूध उत्पादक संस्थांनी व्यक्‍त केली असून, गोवा डेअरीच्या या निर्णयावर संताप व्यक्‍त केला आहे. गोवा डेअरीने दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून पशुखाद्यावरील ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी डिचोलीतील नानोडा दूध उत्पादक संस्थेचे प्रमोद सिध्दये, साळ येथील भूमिका दूध उत्पादक संस्थेचे आदिनाथ परब, आमठाणे दूध उत्पादक संस्थेचे वैभव परब आणि अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली आहे.
गोवा डेअरीचा कारभार चालवणे शक्‍य नसल्यास ती उत्पादकांच्या ताब्यात द्या. अशी मागणीही या संस्थांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. आज  डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेस मोहन एकावडे (म्हावळिंगे), अरुण गावस (कुमयामळ), नितीन प्रभूगावकर (म्हार्दोळ), विश्वास सुखटणकर (कुंभारजुवा) आणि गजानन पालकर हे विविध दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. हायएनर्जी पशुखाद्यात प्रति किलो ४ रुपये वाढ करण्याचा निर्णय गोवा डेअरीने घेतला असून, उद्यापासून (ता.१६) ही दरवाढ लागू होणार आहे. तसे परिपत्रकही गोवा डेअरीने दूध उत्पादक सोसायटीना पाठविले आहे. या दरवाढीनुसार आता पशुखाद्याच्या ५० किलोच्या प्रति पोत्यामागे उत्पादकांना १ हजार १९२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या हाच दर ९९२.५० रुपये असा आहे.

रेती काढणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

सरकारचे नियंत्रण नाही
गोवा डेअरीवर सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. मात्र, प्रशासक आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या मनमानी कारभारामुळे दूध उत्पादकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वसाधारण सभेत मान्यता मिळूनही गेल्यावर्षीचा बोनस अद्याप दूध उत्पादकांच्या हाती पडलेला नाही. गोवा डेअरीने दूध विक्री दरात वाढ केली आहे. मात्र, दूध उत्पादकांना समाधानकारक दरवाढ मिळत नाही. गोवा डेअरीवर सरकारचे नियंत्रण नसल्याने डेअरीत मनमानी वाढली आहे. एकंदरीत कारभार पाहता, गोवा डेअरीची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे.अशी टिका वैभव परब, आदिनाथ परब आणि इतर दूध उत्पादक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.गोवा डेअरीचा कारभार चालवायला जमत नसल्यास डेअरीवरील प्रशासक आणि व्यवस्थापकीय संचालकांना हटवून, ती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात द्यावी, अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

संबंधित बातम्या