करंजाळे परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:मोन्‍सेरात यांच्‍याकडून तक्रारींची दखल
करंजाळे येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.त्यापूर्वी लोकांनी ताळगाव पंचायतीकडे केलेल्या तक्रारींची दखल आमदार तथा महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी घेत या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.त्याशिवाय ती कामे संबंधित खात्यांकडून तत्काळ करून घेण्याच्या सूचना सरपंचांना देण्यात आल्या.या पाहणीप्रसंगी मंत्री मोन्सेरात यांच्यासमवेत सरपंच आग्नेल डिकुन्हा, महापौर उदय मडकईकर, नगरसेवक, विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

करंजाळे परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पंचायतीने हाती घेतले आहे.या परिसरातील काही भाग पंचायतीत आणि काही भाग महापालिकेत येतो.परंतु पंचायतीने मिरामारकडून दोनापावलाकडे जाणाऱ्या आतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.त्यानुसार कामाच्या निविदा प्रक्रियेला सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरवात केली आहे.परंतु डांबरीकरणापूर्वी पंचायतीने अनेक कामे केली नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. वीजवाहिन्या, झाडांच्या फांद्या, तुंबलेली गटारे अशा अनेक समस्यांमुळे लोक त्रासले आहेत.याशिवाय रस्ता पूर्णतः खराब झाल्यामुळे वाहनांची वर्दळ सुरू राहताच धुळीचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.याशिवाय अनेक रस्त्यांवर वीज दिवे लागत नसल्‍याची तक्रार करण्यात आली होती.
येथील नागरिकांनी रस्त्याच्या बाजूची गटारे उघडल्यामुळे आणि रस्ता व्यवस्थित न झाल्याने मागील काही आठवड्यांपूर्वी रस्ता आडविला होता.त्यानंतर रस्त्याच्या बाजूंच्या घरातून गटारात सांडपाणी सोडल्याचे महापालिकेला आढळून आले.त्यामुळे महापालिकेने चार घरांतील शौचालयांना टाळे ठोकले होते.आता पुन्हा येथील नागरिकांनी समस्या मांडल्या आहेत.तत्पूर्वी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल मंत्री मोन्सेरात यांनी घेऊन या भागाची पाहणी केली होती.

इंडोको रेमिडीजच्या महसूलात १४ टक्के वाढ

संबंधित बातम्या