आगोंद येथे धोकादायक वळण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

आगोंद:आगोंद पंचायत क्षेत्रातील दुमाणे येथील तीव्र वळणावर पूल आहे. या पुलाचा अंदाज येत नसल्‍याने अनेक पर्यटक याठिकाणी पडून जखमी झाले आहेत. हे तीव्र वळण कमी करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्‍यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी दुचाकी खाली कोसळून एक पर्यटक युवक व युवती जखमी झाले.त्‍यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने इस्पितळात दाखल करण्‍यात आले होते.यात युवतीला मोठी दुखापत झाली होती.

तसेच उत्तर गोव्यातील एक पर्यटक युगुल आगोंद येथे जात असताना दुमाणे येथील त्या धोकादायक तीव्र वळणावर घसरले होते. त्‍यांनाही अपघातास सामोरे जावे लागले.त्यामुळे संबंधितांनी याठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या