काणकोण कदंब बसस्थानकाची दुरावस्था 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

काणकोण:काणकोणात आशियातील एक पहिले अद्यावत बसस्थानक म्हणून बांधलेल्या कोणकोणमधील कदंब बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे.सध्या मात्र या बसस्थानकाच्या छपराचे ७० % पेक्षा जास्त पत्रे पावसाळ्यात उडून गेले होते.त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.संबंधित विभागाने याकडे लक्ष्य देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे . 

कोणकोण बस्थानकावर आठ दुकाने व एक उपहारगृह आहे.पावसाळ्यात छपराला गळती लागल्याने दुकानदारांचे हाल झाले होते.त्यांनी दुकानासमोर ताडपत्री बांधून आपल्या दुकानाचे रक्षण केले.दोन वर्षांमागे या बसस्थानकाच्या छपराचे पत्रे उडून जाण्याची प्रक्रिया सुरु झाली.मात्र कदंब वाहतूक महामंडळाने बस स्थानकाच्या दुरुस्तीकडे लक्ष्य दिले नसल्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे. 

"छायापत्रकाराची कॉलर पोलिसांना पडली महागात "
काणकोण कदंब बसस्थानकावर ३० कदंब बसगाड्या ये-जा करतात.त्याशिवाय काही खासगी बसगाड्या या बसस्थानकावर येतात.सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या बसस्थानकावर बसगाड्यांची वर्दळ असते.मात्र त्यानंतर या बसस्थानकावर सामसूम असते.त्याचप्रमाणे पथदीपही सारखे पेटत नाही.गेल्या महिन्यात महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी उपसभापती ईजिदोर फर्नांडिस यांच्यासोबत पाहणी करून लवकरच बस स्थानकाच्या छपराची दुरुस्ती करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. 

संबंधित बातम्या