‘बॉल’ जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात, २३ रोजी मिरवणुकीचे आयोजन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

मडगाव कार्निव्हल मिरवणूक मार्गावर आज निर्णय
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मडगाव कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने सायंकाळी उशिरा पर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्या बंगल्यावर भेट घेण्यासाठी थांबले होते. मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत कोणता निर्णय झाला याची माहिती मिळू शकली नाही.

नावेली : कार्निव्हल मिरवणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास अनुसरून मडगाव कार्निव्हल समितीने मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर अर्ज केला असून या अर्जावर जिल्हाधिकारी २२ फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

मडगावात २३ फेब्रुवारी रोजी कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्निव्हल मिरवणूक मार्गाच्या विषयावर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी २२ रोजी बैठक बोलावली असून या बैठकीत मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर व संबंधित अधिकारी उपस्थित असतील. बैठक दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.

मडगाव कार्निव्हल समितीतर्फे यंदा कार्निव्हल मिरवणूक मडगावातून काढण्यासाठी पालिका इमारतीसमोर व्यासपीठ उभारण्यात आले असून प्रेक्षकांना कार्निव्हल मिरवणुकीचा आनंद लुटता यावा यासाठी पालिका इमारती समोर मंडप तसेच मडगाव शहरात कार्निव्हल सजावट करण्यात आली आहे.मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आयोजकांची तारांबळ उडाली आहे.

शॅडो कौन्सील फॉर मडगावच्या वतिने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.ज्या दिवशी जुन्या मार्गावरून कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येईल हे सांगण्यात आले त्यादिवसा पासूनच आपण अस्वस्थ होतो असे शॅडो कौन्सील फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.
कार्निव्हल समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपत्कालीन सेवे संबंधात जुन्या कार्निव्हल मार्गावर अनेक हॉस्पिटल तसेच खास करून हॉस्पिसीयो हॉस्पिटल आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनाफोंत गार्डन सिमेटरी जंक्‍शन,मोती डोंगर रस्ता होली स्पिरीट चर्च रस्ता कार्निव्हल मिरवणूकी साठी बंद राहील एखाद्या रुग्णाला हॉस्पिसीयोत दाखल करायचा असेल तर त्याला आके ते पानीफोंड मार्गे हॉस्पिटल मध्ये आणावे लागेल.कार्निव्हल हा लोकांचा उत्सव आहे.त्याला राजकिय वळण देऊ नये हा सण करदात्याच्या पैशातून साजरा केला जातो.

उच्च न्यायालयाने सर्वच उत्सवासाठी हा निर्णय लागू करावा अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.
मडगाव शहरातून कार्निव्हल मिरवणूक काढण्यास विरोध करणारी याचिका फातोर्डा येथील कस्टोडिओ डायस यांनी दाखल केली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आली. या मिरवणुकीला या बदलेल्या मार्गासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे सरकारने खंडपीठाला सांगितले. त्यामुळे खंडपीठाने ही याचिका निकालात काढताना परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकारिणीने योग्य विचार करून निर्णय द्यावा असे निर्देश दिले.

१०८ शिवलिंग दर्शन सोहळा

नगराध्यक्षांविरुद्ध तक्रार
कार्निव्हल मिरवणूक मार्गासंदर्भात पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावात फेरफार केल्याचा आरोप करून नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांच्यास १२ नगरसेवकांनी नगराध्यक्ष पूजा नाईक यांच्या विरुद्ध दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कार्निव्हल मिरवणूक जुना बाजार येथील कोलवा सर्कल ते रवींद्र भवन मार्गावर घेण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावात फेरफार झाला असून उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात हा ठराव सादर करून गैरफायदा घेण्यात आला. ठराव मांडण्यात आला तेव्हा उपस्थित बहुसंख्य नगरसेवकांनी होली स्पिरिट चर्च ते पालिका चौक मार्गावर मिरवणूक काढण्यात यावी असा ठराव मंजूर केला होता असे या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवर क्‍लारा फर्नांडिस, केतन कुरतरकर, दामोदर नाईक, डोरीस टेक्‍सेरा, मनोज मसुरकर, रुपेश महात्मे, शरद प्रभुदेसाई, विनय शिरोडकर, जाफर बुधानी, दीपा शिरोडकर, सुगंधा बांदेकर व आर्थुर डिसिल्वा यांच्या सह्या आहेत

संबंधित बातम्या