पणजी करणार नाट्य महोत्सवात सादरीकरण

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अभिव्यक्ती संस्थेला भारतरंग दिल्लीचे निमंत्रित

गोमंतकीय काव्यात शंखासुराचा प्रवेश झाल्यानंतर वेदहरण हे आख्यान प्रतिभाशाली गेामंतकीय रंगकर्मी अनघा देशपांडे यांनी जोडून त्याला वेगळा आयाम दिला आहे. शंखासून ब्रह्मदेवाचे वेद चोरून आपल्या राज्यात जातो व त्यावर आपली मक्तेदारी करू लागतो. वेदाध्ययनाचे व्यापारीकरण राजकीय स्वार्थासाठी करू लागतो.

 

पणजी : भारतरंग या नवी दिल्ली येथे आशियातील प्रतिष्ठेच्या आणि भव्य स्वरूपात होणाऱ्या नाट्य महोत्सवात नाटक सादर करण्यासाठी अभिव्यक्ती, पणजी या संस्थेला निमंत्रित करण्यात आले आहे. पारंपरिक लोकनाट्य विभागात अभिव्यक्ती निर्मित पारंपरिक गोमंतकीय काव्यावर आधारित वेदहरण हा प्रयोग राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या प्रांगणातील खुल्या रंगमंचावर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजत सादर होणार आहे.

त्यामुळे सामान्य जनतेत असंतोष पसरतो या कथानकातून असा संदेश दिले आहे की, वेद हे ज्ञानाचे प्रतीक असून ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी होऊ शकत नाही.

ज्ञान मिळवणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. गोमंतकीय काल्यावर आधारित या प्रयोगाच्या निर्मितीत लोककलेचे गाढे अभ्यासक विनायकराव खेडेकर व ज्येष्ठ तबलावादक पं. उल्हास वेलिंगकर यांची मोलाची मदत लाभली असे अभिव्यक्तीचे संस्थापक तथा प्रसिद्ध रंगकर्मी साईश देशपांडे यांनी सांगितले.

अभिव्यक्ती ही संस्था गेली २१ वर्षे गोमंतकीय रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करीत आली आहे व संस्थेने अभिजात नाटके, पारंपरिक नाटके, तसेच आधुनिक रंगभूमीशी निगडीत प्रयोग तरुण कलाकारांना घेऊन मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रज व संस्कृत या भाषेत केले आहेत. पारंपरिक कालो हा नाट्यप्रकाराचे संवर्धन व्हावे, या हेतूने त्या ही निर्मिती केल्याचे साईश देशपांडे यांनी सांगितले. आशियातील एक प्रतिष्ठेच्या महोत्सवात गोव्याच्या संस्थेला गोमंतकीय पारंपरिक नाटक सादर करण्याची संधी मिळावी ही गोव्याच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आहे.

यापूर्वी अभिव्यक्तीच्या कालिदास प्रतिभोन्मेषः या संस्कृत नाटकाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान लाभला होता. साईश व अनघा देशपांडे यांनी बसविलेले नागानंद हे नाट महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम आले होते. शुक्रवार दि. २४ जणांचा चमू वेदहरण नाटकाच्या सादरीकरणासाठी दिल्लीला रवाना होत आहेत.

 

 

काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

 

संबंधित बातम्या