नवोदयमध्ये दिल्लीतील १८ मुले सुरक्षित

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

मुंगेशपूर -दिल्ली जवाहर नवोदयची १८ मुले वाळपईच्या नवोदय विद्यालयात अडकून राहिली आहेत.

वाळपई

कोरोना रोगामुळे देशात टाळेबंदी असल्याने अनेकजण अडकलेले आहेत. वाळपई येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील १३ मुले दिल्ली येथे जवाहर नवोदय विद्यालयात शिकतात तर मुंगेशपूर -दिल्ली जवाहर नवोदयची १८ मुले वाळपईच्या नवोदय विद्यालयात अडकून राहिली आहेत. या मुलांच्या परीक्षा संपून दीड महिना उलटून गेला असून हे विद्यार्थी घरी कधी पोचणार, या प्रतीक्षेत आहे. या विद्यार्थांना घरी पोचविण्याची तयारी सरकारने केली आहे. त्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कदाचित उद्या बहुतेक शनिवार २ मे रोजी बसने पोचविले जाईल, अशी शक्यता आहे. वाळपईत अडकलेले दिल्लीचे १८ ही विद्यार्थी सुरक्षित स्थितीत आहेत. त्यांना दररोज जेवणाची योग्य व्यवस्था केली जाते आहे.
येथील इतर सर्व विद्यार्थी सुटी मिळाल्यानंतर आपल्‍या घरी पोचले असून फक्त १८ विद्यार्थीच येथे आहेत. यात काही मुली व काही मुले आहेत. आंतरराज्य सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी येथील काही मुले नवी दिल्लीतील जवाहर नवोदयमध्ये पाठविली जातात व तेथील काही विद्यार्थी गोव्यात येतात. वर्षभर येथे शिकून पुन्हा १० व्या इयत्तेसाठी आपापल्या राज्यात परतात. परंतु यंदा टाळेबंदीमुळे दोन्हीकडील विद्यार्थ्यांना आपल्या राज्यात येणे कठीण झाले आहे.

संबंधित बातम्या