होम अप्लायन्सेसची मागणी वाढतेय

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बीएसएच होम अप्लायन्सेसचे प्रमुख नीरज बहल यांचे मत

भारतातील ग्राहकांच्या गरजा बदलत असून, तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाचाही यात महत्त्वाचा वाटा आहे.

 

 

पुणे :  बदलत्या पिढीमुळे आणि जीवनशैलीमुळे होम अप्लायन्सची मागणी भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे भारतात आगामी काळात होम अप्लायन्स क्षेत्रात मोठी वाढ होईल, असे मत "बीएसएच होम अप्लायन्सेस' कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बहल यांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाच्या कार्यालयाला बहल यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भारतातील होम अप्लायन्स क्षेत्राची वाढती बाजारपेठ, मागील दोन दशकांत या क्षेत्रात झालेले बदल आणि भविष्यातील आव्हाने यासंदर्भात संवाद साधला. ते म्हणाले, ओव्हन, वॉशिंग मशिन, डिश क्‍लीनर, मिक्‍सर ग्राइंडरसारख्या अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत बॉशने स्थान निर्माण केले आहे. कंपनी ग्राहकांना नेमके काय हवे, यावर भर देते. महिलांचे दैनंदिन कामकाज सुकर व्हावे, यासाठी संशोधन आणि विकासाकडे लक्ष दिले जात आहे. प्रदूषण कमी करणारी नवीन स्वरूपाची चूलसुद्धा कंपनीने विकसित केली आहे.''

आम्ही कोणतेही उत्पादन विकसित करताना भारतीयांच्या गरजा आणि त्यांची मानसिकता लक्षात घेतो. त्यामुळेच आमची उत्पादने भारतात लोकप्रिय ठरत आहेत. भारतात महानगरांपासून छोट्या शहरांपर्यत वेगवेगळ्या प्रकारची बाजारपेठ आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरत आहे,'' असे त्यांनी सांगितले.
""मागील वर्षभरात बॉशने तंत्रज्ञानकौशल्य आणि ग्राहकाभिमुखतेच्या जोरावर 30 टक्के व्यवसायवृद्धी साधली आहे. कंपनीचे बंगळूरमध्ये संशोधन व विकास केंद्र आणि चेन्नईत उत्पादन प्रकल्प आहे. भविष्यातील आव्हानांसाठी कंपनी तयार आहे,'' असे त्यांनी नमूद केले.

 

संबंधित बातम्या