पंजाबी पाजीकडून जो बायडन आणि कमला हॅरिस यांना अनोखी भेट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

भेट म्हणून पंजाबमधील एका कलाकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरीस यांचे हूबेहूब चित्र रेखाटले आहे.

पंजाबः अमृतसरमधील एका कलाकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांचे चित्र रेखाटले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाचा उद्या शपथ विधी होणार आहे. सोबतच भारतीय वंशाच्या कमल हॅरीस उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. भारतीय  वंशाच्या कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष असणार आहेत.  

राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस  यांचा शपथविधी वॉशिंग्टन येथे पार पडणार आहे. तेव्हा त्यांना भेट म्हणून पंजाबमधील एका कलाकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरीस यांचे हूबेहूब चित्र रेखाटले आहे.

जो बायडन आणि कमला हॅरीस शपथ घेणार असल्याने मला त्यांना ही भेट द्यावीशी वाटली, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष होत आहेत हे पाहून मला फार अभिमान वाटतो आहे. आणि म्हणून मी त्यांना ही भेट देत आहे." असे जगजोतसिंग रुबल यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या