पाकिस्तानातून तब्बल 18 वर्षानंतर भारतीय महिलेची सुटका

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

हसीना यांचा पाकिस्तानात पासपोर्ट हरवल्यामुळे त्यांना तुरुगांत जावं लागले. अखेर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नामुळे हसीना पुन्हा भारतात पोहचल्या.

नवी दिल्ली: 18 वर्षापूर्वी पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगांबाद मधील रशीदपुरा येथील रहिवाशी असणाऱ्या हसीना बेग पाकिस्तानात गेल्या होत्या. परंतु त्या थेट चक्क पाकिस्तानातील तुरुगांत पोहचल्या. हसीना यांचा पाकिस्तानात पासपोर्ट हरवल्यामुळे त्यांना तुरुगांत जावं लागले. अखेर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नामुळे हसीना पुन्हा भारतात पोहचल्या.

हसीना बेगम यांचा उत्तरप्रदेशातील दिलशाद अहमद यांच्याशी विवाह झाला होता. पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या पाकिस्तानात गेल्या. मात्र पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा पासपोर्ट गहाळ झाला. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पकडून तुरुंगात टाकले. पुढे हसीना बेगम यांना पाकिस्तानातील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी आपण निष्पाप असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर न्यायालयाने खात्री करण्यासाठी औरंगाबाद पोलिंसाकडून माहिती मागवून घेतली. न्यायालयाने माहितीची पुष्टी केल्यानंतर त्य़ांची सुटका केली. परंतु त्यांच्या सुटकेसाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला.

वर्षांनंतर हसीना बेगम भारतात परतल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. ‘’मी प्रचंड वेदनेतून गेले आहे. मला मायदेशात परतल्यानंतर शांत वाटत आहे. मला भारतात आल्यानंतर स्वर्गात आल्यासारखे वाटत आहे. मला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने तुरुंगात टाकलं. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी खूप सहकार्य केले, त्यांचे मी मनापासून आभार मानते.’’ अशा भावना पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर हसीना बेगम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.        

 

संबंधित बातम्या