बर्ड फ्लू अपडेट: गोवा पशुवैद्यकीय विभागाने पक्ष्यांच्या विष्ठा तपासण्यास केली सुरुवात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

गोव्यातील एव्हीयन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) ची भीतीदायक स्थिती निर्माण झाल्यामुळे गोव्यातील पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाने डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आणि कॅरंबोलीम तलावातील स्थलांतरित पक्ष्यांची विष्ठा तपासली आहे.

पणजी: गोव्यातील एव्हीयन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) ची भीतीदायक स्थिती निर्माण झाल्यामुळे गोव्यातील पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाने डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आणि कॅरंबोलीम तलावातील स्थलांतरित पक्ष्यांची विष्ठा तपासली आहे.

वन विभागाची मदतीने “खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली जात आहेत. प्रवासी पक्षी या हंगामातच गोव्यात येतात. या हंगामात वनविभागाच्या सहकार्याने प्रवासी पक्ष्यांची तपासणी करण्याची आमची नियमित पद्धत आहे असे वन विभागाने सांगितले.

 एएचव्हीएसने पूर्वेकडील राज्यांमधून आणि शेजारील काही राज्यांमधून पोल्ट्री पक्ष्यांना गोव्यात आणण्यास मनाई करण्याचा आदेश काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. पुढाकार घेईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात कोंबड्यांच्या आयातीस बंदी घातली आहे. 

“आम्हाला माहिती मिळाली ती दापोलीम, रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कावळे आणि कुक्कुट पक्षी बर्ड फ्लूमुळे मरण पावले आहेत. म्हणून आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

एएचव्हीएसचे उपसंचालक डॉ. राजेंद्र प्रभुगांवकर, जे राज्य पशुवैद्यकीय रोगशास्त्रज्ञ देखील आहेत.  ते म्हणाले की, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोवा एएचव्हीएस या विषाणूच्या संभाव्य प्रादुर्भावावर सामोरे जाण्यासाठी तयार आहे.

“आम्ही उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी पीपीई किट, सॅनिटायझर्स आणि डॉक्टरांचे जलद प्रतिसाद पथक सतर्क ठेवले आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यास अतिरिक्त सामग्रीसाठी पुरवठा ऑर्डर देण्यासाठी कोटेशन देखील देण्यात आले आहे. 

आशा आहे की गोव्यात कोणताही उद्रेक होऊ नये, ”ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गोव्यात आतापर्यंत मनुष्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झा सापडला नाही आणि गोव्यातील कुक्कुटपालनातही हा विषाणू आढळला नाही.

आणखी वाचा:

पणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांचा दुकान बंद -

संबंधित बातम्या