बर्ड फ्लू: उत्तर गोव्यात महाराष्ट्र, कर्नाटकमधील चिकनवर बंदी

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने महाराष्ट्रा आणि कर्नाटकातून येणाऱ्या पक्षी आणि अंड्यांच्या उत्पादनांवर बंदी घातली होती.

पणजी: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने शेजारील राज्यांमधून होत असलेल्या कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन उत्पादनांवर बंदी घातली होती. काही दिवसानंतर या निर्णयाचा  उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आहे.

'प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या पक्षी आणि अंड्यांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, “या आदेशाचा भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये दंड ठोठावला जाईल.”

दुसर्‍या राज्यात एव्हीयन इन्फ्लूएन्झा ( बर्ड फ्लू ) झाल्याची घटना घडल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिका्यांनी बंदीचा निर्णय घेतल्याचा अहवाल गेल्या आठवड्यात सादर केला होता. दरम्यान, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा राज्य संचालनालयाने नागरिकांना कुक्कुटपालन आणि वन्य पक्ष्यांमध्ये होणाऱ्या कोणत्याही असामान्य आजाराची आणि मृत्युची माहिती सहाय्यक संचालक, रोग तपासणी युनिटच्या कार्यालयात द्यावी अशी विनंती केली आहे.

 

संबंधित बातम्या