गोवा सरकारची मागणी असलेल्या 'खाण व खनिज' कायद्याच्या दुरुस्तीवर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीसमोर 'खाण व खनिज' ( नियंत्रण व विकास) कायद्यात दुरुस्ती हा विषय चर्चेला येणार आहे.

पणजी :  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीसमोर खाण व खनिज ( नियंत्रण व विकास) कायद्यात दुरुस्ती हा विषय चर्चेला येणार आहे. मात्र या यासंदर्भातील दुरुस्ती ही गोवा सरकारने सुचवल्याप्रमाणे आहे की नाही याची माहिती मिळालेली नाही. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती त्या भेटी वेळी यासंदर्भात चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय खाण मंत्रालयाने या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ सचिवांकडे सादर केला आहे.

कोरोनाची कोवीशिल्ड लस गोव्यात पोहोचली 

उद्याच्या बैठकीत तो प्रस्ताव चर्चेला येणार आहे. गोव्यातील बंद पडलेल्या खाणी सुरू करण्यासाठी ही कायदा दुरुस्ती करावी अशी गोवा सरकारची मागणी आहे. या कायद्यातील ही दुरुस्ती गोवा सरकारच्या मागणीनुसार होत आहे की देशभरातील इतर खाणपट्ट्यांचा लिलाव सुरळीत होण्यासाठी करण्यात येत आहे हे मात्र समजू शकलेले नाही. गोव्यातील पोर्तुगीजकालीन खाण परवान्यांचे खाणपट्ट्यांत रूपांतर करणारा करणाऱ्या 1987 च्या कायद्यात दुरुस्ती करावी असेही गोवा सरकारचे म्हणणे आहे, मात्र त्याविषयी केंद्र सरकारने फारशी दखल घेतली नाही असे सध्या दिसते.

आयआयटी’ सत्तरीतही नकोच, गोवा सरकारमधले मतभेद चव्हाटयावर

गेली दोन वर्षे 88 खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर गोव्यातील खाणकाम बंद आहे. सध्या ईलिलाव पुकारलेल्या खनिज मालाची वाहतूक केली जात असल्याने खाण भागातील लोकांना काही प्रमाणात काम मिळाले आहे. गोव्यातील विधानसभेच्या येत्या निवडणुकीत बंद पडलेले खाणकाम हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असू शकतो.

संबंधित बातम्या