गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचाही समावेश आहे. पद्मश्री पुरस्कारासाठीही त्यांची निवड झाली आहे.  त्या आता या जगात नाही. त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार हा सन्मान मिळाला आहे. 

पणजी: 26 जानेवारी रोजी संध्याकाळी गृहमंत्रालयाने पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या दिग्दजांची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचाही समावेश आहे. पद्मश्री पुरस्कारासाठीही त्यांची निवड झाली आहे.  त्या आता या जगात नाही. त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार हा सन्मान मिळाला आहे. गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा  यांचे वय 78 वर्ष होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे बिहारमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले.  सिन्हा या गोव्याच्या 2014  ते 2019 दरम्यान राज्यपाल होत्या. त्या बर्‍याच काळापासून जनसंघाशी संबंधित होती. मृदुला सिन्हा गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. राजकारणाव्यतिरिक्त त्यांचे नाव साहित्यविश्वातही प्रसिद्ध होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या पुस्काराबाबत आनंद व्यक्त केला. "गोव्याचे माजी राज्यपाल कै. डॉ. मृदुला सिन्हा यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे हे ऐकून  मला आनंद झाला. त्यांचे राष्ट्रासाठी असलेले विपुल योगदान कायम लक्षात राहील," असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

 

त्यांनी 46 हून अधिक पुस्तके लिहिली आणि विजयवराज सिंधिया यांच्यावर एक पुस्तकही लिहिले ज्याचे 'वन क्वीन' असे नाव आहे. त्यावर एक चित्रपटही तयार करण्यात आला आहे. मृदुला सिन्हा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1942 रोजी बिहारमधील छप्रा येथे झाला होता. सिन्हा या गोव्याच्या पहिल्या पूर्णवेळ महिल्या राज्यपाल होत्या. त्या हिंदीतील प्रतिथयश साहित्यिक होत्या. राज्यपालपदी येण्याअगोदर त्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्याही त्या अध्यक्ष होत्या. जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. मानशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यानंतर शिक्षणशास्रातील पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांचा विवाह डॉ. रामकृपाल सिन्हा यांच्याशी झाला ते आधी महाविद्यालयातील व्याख्याते होते त्यानंतर ते मंत्री झाले. सिन्हा यांनी 46 पुस्तके लिहिली आहेत.

 

 

संबंधित बातम्या