गोवा ते हुबळी हवाई वाहतूक सेवा सुरु

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

इंडिगो एअरलाइन्स ही सेवा पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. 

पणजी: गोवा ते हुबळी हवाई वाहतूक सेवा २० जानेवारीपासून पूर्ववत सुरु होणार आहे. कोविड टाळेबंदीच्या काळात ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता इंडिगो एअरलाइन्स ही सेवा पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. 
सध्या दाबोळी येथील विमानतळावर सरासरी ६५-७० विमाने ये जा करत आहेत. त्यात येत्या काही दिवसांत वाढ अपेक्षित असल्याचे विमानतळ संचालक गगन मलिक यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या