देवाच्या आशिर्वादामुळेच पाहिला आज दिवस - श्रीपाद नाईक 

 Shripad Naik Said Thanks to God and all the people I was able to see this day
Shripad Naik Said Thanks to God and all the people I was able to see this day

पणजी: होस्कुंबी येथील भीषण अपघातातून बचावलेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना पहिल्यांदाच उपचार सुरू असलेल्या गोमेकॉच्या इस्पितळाबाहेर आज खुल्या हवेत फिरवण्यास आणले होते. देवाच्या तसेच सगळ्या लोकांच्या आशिर्वादानेच खूप दिवसांनी आज हा मी दिवस पाहिला. मी बरा होतो आहे. संसर्गामुळे कोणी इस्पितळात भेटण्यास येऊ नये अशी विनंतीवजा आवाहन त्यांनी केले आहे. 

इस्पितळात उपचार घेत असलेले नाईक यांना गोमेकॉ इस्पितळातील डॉक्टरांनी त्यांना तेथील आवारातच खुल्या हवेत आणले होते तेव्हा ते पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. मी इस्पितळाबाहेर व्हिलचेअरवरून आलो याचाच अर्थ समजून घ्या की मी बरा आहे व मला भेटण्याची कोणी घाई करू नये. येत्या ४ - ५ दिवसांत मी इस्पितळातून डिस्चार्ज घेऊन घरी येईन त्यावेळी मी सर्वांनाच भेटणार आहे. कृपा करून सध्या सर्वांनी आहे तेथूनच माझ्या प्रकृतीची माहिती घ्यावी व इस्पितळात येऊ नये अशी विनंती त्यांनी लोकांना प्रसारमाध्यमाद्वारे केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com