विश्रांतीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी गोव्‍यात

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

दिल्लीतील हवेची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हवापालटाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ते गोव्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पणजी : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचे आज खासगी विमानाने गोव्यात आगमन झाले. त्यांचा आठवडाभर दक्षिण गोव्यातील ‘द लिला’ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये मुक्काम असेल. त्यांचा हा खासगी दौरा असल्याने स्थानिक नेते, पदाधिकारी यांना त्या भेटणार नाहीत.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गांधी गोव्यात आल्याच्या माहितीला दुजोरा देताना सांगितले की, विश्रांतीसाठी त्या गोव्यात अधूनमधून येत असतात.

त्यांचा हा दौरा खासगी असल्याने आम्ही कोणी त्यांना संघटनात्मक कामासाठी भेटणार नाही. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गांधी यांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना नव्हती, असे सांगून खासगी दौऱ्यादरम्यान कोणतीही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट केले. निळे टी शर्ट आणि जीन्स घातलेल्या राहुल गांधी यांच्या हातामध्ये एक बॅगही होती. तर सोनिया गांधी यांनी फेस शिल्ड लावलेलं होतं.  दिल्लीतली थंडी सोनिया यांच्या प्रकृतीसाठी त्रासदायक ठरत असल्‍याने त्यांनी गोव्याची निवड केली.

दिल्लीतील खराब हवामानामुळे गोव्‍यात
दिल्लीतील हवेची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हवापालटाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ते गोव्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी यांना प्रकृतीचा त्रास होतो. त्याच बरोबर छातीमध्ये इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे दिल्लीतील सध्‍याच्‍या हवेत आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काही दिवस दिल्लीबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्‍याची माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या