उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोवा राजभवनावर केली भोगी साजरी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राजभवनवर भोगी साजरी केली. उपराष्ट्रपती सध्या गोव्यामध्ये असून ते राजभवनवर वास्तव्यास आहेत.

पणजी: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राजभवनवर भोगी साजरी केली. उपराष्ट्रपती सध्या गोव्यामध्ये असून ते राजभवनवर वास्तव्यास आहेत. गोवा विधानसभेच्या विधीकार दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने ते गोव्यात आलेले आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतींचा हा खासगी दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान असता राजभवनावर आज त्यानी भोगी साजरी केली आणि सर्वांना भोगीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नायडू यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. नायडू यांचे काही कुटुंबीय गोव्यात स्थायिकही झालेले आहेत.

आणखी वाचा: 

गोवा सरकारची मागणी असलेल्या खाण व खनिज कायद्याच्या दुरुस्तीवर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा -

संबंधित बातम्या