उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी घेतली श्रीपाद नाईकांची भेट

Vice President Venkaiah Naidu met Shripad Naik
Vice President Venkaiah Naidu met Shripad Naik

पणजी :उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक हे कर्नाटक दौऱ्यावरून गोव्यात परतत असताना यल्लापूर - गोकर्ण रस्त्यावर होस्कुंबी येथे सायंकाळी सात वाजता त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे गंभीर जखमी झाले होते.  आणि  त्यांच्या पत्नी विजया व त्‍यांच्‍यासोबत गाडीतून प्रवास करणारे डॉ. दीपक घुमे हे ठार झाले होते. जखमी नाईक यांना रात्री पावणे बारा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान अधिक उपचारासाठी ‘गोमेकॉ’त हलवण्यात आले होते.

सध्या गोवा दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसेच दिल्लीहून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातआले होते. श्रीपाद नाईक यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांचा या अपघातात मृत्यू झाला. काल सापेर-जुने गोवे येथील केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या घरी सो. विजया श्रीपाद  नाईक यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी घेण्यासाठी सकाळी ८ ते ९.३० पर्यंत ठेवण्यात आले होते  त्यावेळी  अंतिम दर्शना झालेली गर्दी,नंतर  मुळगावी आडपई येथे अंत्यदर्शन  व दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक हे कर्नाटकात गेले होते. ते यल्लापूर येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी शिर्शीच्या गणपती देवस्थानात जाऊन दर्शनही घेतले होते. ते यल्लापूर गोकर्ण राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ मार्गे येताना होस्कुंबी, शिरूरमार्गे गोकर्णकडे निघाले असता त्यांच्या कार ला अपघात झाला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे गोवा दौऱ्यावर आहेत त्यांनी आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आणखी वाचा: 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com