अवैध वाहनांना त्यांच्या दुप्पट टोल आकारला जाणार

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

या सुधारणेपूर्वी वाहनाच्या वापरकर्त्याने फास्टॅग शिवाय “फास्टॅग लेन” मध्ये प्रवेश केला तरच टोल  प्लाझावर दुप्पट पैसे द्यावे लागत होते.

नवी दिल्ली,

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर व संकलन निर्धारण) नियम, 2008 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 15 मे 2020 रोजी जीएसआर 298 ई,ही अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर एखादे वाहन फास्टॅग लावलेले नसेल किंवा अवैध किंवा अकार्यक्षम फास्टॅग लावलेले असेल आणि त्याने टोल प्लाझाच्या  “फास्टॅग लेन” मध्ये प्रवेश केला तर त्या वाहनांच्या प्रकारानुसार लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट समतुल्य फी भरावी लागेल.

या सुधारणेपूर्वी वाहनाच्या वापरकर्त्याने फास्टॅग शिवाय “फास्टॅग लेन” मध्ये प्रवेश केला तरच टोल  प्लाझावर दुप्पट पैसे द्यावे लागत होते.

संबंधित बातम्या