आयुर्वेदिक औषधे कोरोनावर उपयुक्त

PTI
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

कोरोनाचा अल्प संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारांत आयुष क्वाथ आणि फिफाट्रोल गोळ्या या आयुर्वेदीक औषधांचा फायदा होत असल्याचे आयुष मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला आढळून आले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा अल्प संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारांत आयुष क्वाथ आणि फिफाट्रोल गोळ्या या आयुर्वेदीक औषधांचा फायदा होत असल्याचे आयुष मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला आढळून आले आहे.  ‘आयुष क्वाथ, संशमनीवटी, फिफाट्रोल गोळ्या आणि लक्ष्मीविलास रस यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीत केवळ सुधारणाच होत नाही तर पुढील सहा दिवसांत त्यांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह येऊ शकते,’ असे आयुर्वेद संस्थेने एका उदाहरणाच्या आधारे म्हटले आहे.  

सध्या कोरोनावर कोणताही निश्‍चित उपचार नाही. आयुर्वेद संस्थेने ३० वर्षांच्या कोरोनाग्रस्त युवकाचे उदाहरण दिले. हा युवक आरोग्यसेवक आहे. त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आल्यावर घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याला आयुष क्वाथ, संशमनीवटी, फिफाट्रोल गोळ्या आणि लक्ष्मीविलास रस ही औषधे तोंडावाटे दिली गेली. या औषधांचा ताप, थकवा, श्‍वास लागणे, भूक न लागणे, वास न येणे आणि चव न लागणे असे त्रास दूर करण्यासाठी उपयोग होतो.

संबंधित बातम्या