खुशखबर! रेल्वे तिकीट बुकिंगवर मिळणार खास सवलत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक तिकीट बुकिंगवर 10 टक्के  डिस्काऊंट मिळणार आहे.

नवी दिल्ली- जर तुम्हालाही प्रवासाची आवड असेल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करत आहात.  तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एसबीआयचे रुपे क्रेडिट कार्ड आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  प्रवाशांना बर्थ बुक करण्यास दहा टक्के सूट देण्याचे भारतीय रेल्वेने ठरविले आहे.  कोविड -19 या साथीच्या आजारामुळे बर्‍याच गाड्या मोठ्या संख्येने रिक्त जागांसह धावत आहेत.  हा तोटा भरुन काढण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना ही सवलत दिली आहे जेणेकरून त्या जागा रिक्त असू नये आणि त्यामुळे तोटा सहन करावा लागू नये. 

रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक तिकीट बुकिंगवर 10 टक्के  डिस्काऊंट मिळणार आहे. रेल्वे सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सिटिंग चार्ट तयार झाल्यानंतर आणि बर्थमध्ये काही जागा शिल्लक असल्यास प्रत्येक तिकिट बुकिंगमागे तुम्हाला 10 टक्के डिस्काऊंट मिळू शकणार आहे. यासाठी मात्र एक अट असणार आहे, तुम्हाला रेल्वे निघण्याच्या 30 मिनिटे अगोदर तिकीट बुकिंग करता येणार आहे. तुम्ही काऊंटरवरुन किंवा आयआरसीटीसी च्या वेबसाईटवरुन हे तिकीट बुकिंग करु शकता. सर्व स्पेशल ट्रेनसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. 

उदाहरणार्थ, प्रवाशाने रेल्वे निघण्याआधी 30 मिनिटापूर्वी तिकिट बुकिंग केली असल्यास 2,760 रुपयांचं एसी तिकीट 2,500 रुपयांना मिळणार आहे. एसी टायर टूचे तिकीट 1,645 रुपये असल्यास ते तुम्हाला 1,490 रुपयांना मिळणार आहे. तसेच  AC Third चे तिकीट 1,165 रुपयांना असल्यास ते 1,060 रुपयांना मिळणार. स्लिपर क्लासचे तिकीट 445 रुपयांऐवजी 405 रुपयांना बुक करता येणार आहे. जनरल श्रेणीतील 260 रुपयांचे तिकीट 240 रुपयांना मिळणार आहे. एसबीआय कार्ड आणि इंडियन रेल केटरिंगन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) च्या भागीदारीत सुरू केलेल्या रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रेल्वेच्या तिकिट बुकिंगवर तुम्हाला १० टक्के पर्यंत सूट मिळू शकेल.

VIDEO: कबड्डी खेळतानाच हार्टअ‍ॅटक, खेळाडूचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद -

पब्लिक रिलेशन ऑफिसर पंकज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 02573/02574 आनंद विहार टर्मिनल्स, मुझफ्फरपूर- आनंद विहार टर्मिनल्स आणि , गाडी क्रमांक  04060/04059 नवी दिल्ली- वाराणसी- नवी दिल्लीला गोरखपूरमार्गे जाणाऱ्या स्पेशल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

गोरखपूर, अहमदाबाद, मुंबई आणि सिंकदराबाद या मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी सध्या कन्फर्म तिकीट उपलब्ध नाही. तसेच प्रवाशी उपलब्ध नसल्याने रेल्वेगाड्या वेगळ्या मार्गाने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेंची संख्या कमी करण्यात आली आहे, तसेच अनेक रेल्वे गाडयां कॅन्सल देखील करण्यात आल्या आहेत. 

 

 

 

 

संबंधित बातम्या