युकेमधून भारतात येणाऱ्यांसाठी 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला

भारताने युकेमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी 1 ऑक्टोबर रोजी जारी केलेली नवीन नियमावली मागे घेतली आहे.
युकेमधून भारतात येणाऱ्यांसाठी 10 दिवसांचा  क्वारंटाईन कालावधी संपला
युकेमधून भारतात येणाऱ्यांसाठीचा 10 दिवसांचे क्वारंटाईन कालावधी संपलाDainik Gomantak

लसीकरण झालेल्या भारतीय प्रवशांसाठी ब्रिटनमधील 10 दिवस क्वारंटाइन ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. यामुळे भारतानेही उदारता दाखवली आहे. भारताने युकेमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी 1 ऑक्टोबर रोजी जारी केलेली नवीन नियमावली मागे घेतली आहे. यात युकेमधून येणाऱ्या प्रवाशांना आता 10 दिवस भारतात क्वारंटाइन राहण्याची गरज नाही. आता फक्त 17 फेब्रुवारी रोजी जारी केलेले नियम ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना लागू होतील.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. जुन्या नियमानुसार, युकेमधून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह-आरटीपीसीआर अहवाल दाखवणे आवश्यक आहे. हा अहवाल 72 तासांपेक्षा जुना नसावा. तसेच विमानतळावर थर्मल स्क्रीनिंगमध्ये सक्रमाणाची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित क्वारंटाइन ठेवण्याची तरतूद केली आहे.

युकेमधून भारतात येणाऱ्यांसाठीचा 10 दिवसांचे क्वारंटाईन कालावधी संपला
Lakhimpur Kheri Case: काँग्रेस शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला, मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी

युकेने 4 ऑक्टोबरपासून नवीन प्रवास नियम घोषित केले होते. याअंतर्गत ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन ठेवण्याची गरज नव्हती,परंतु भारताच्या कोविशील्ड लस घेणाऱ्याना ब्रिटनने ही सूट दिली नाही, तर दोन्ही लस एकाच सूत्रावर बनवल्या आहेत. म्हणजेच दोन्ही डोस घेणाऱ्या भारतीय प्रवाशासाठी ब्रिटनला पोहोचल्यावर 10 दिवस क्वारंटाइन राहणे अनिवार्य होते. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला होता आणि भारताने ब्रिटनचे नियम न बदलल्याबद्दल युकेमधून येणाऱ्याना 10 दिवस क्वारंटाइन ठेवणे बंधनकारक केले आहे.ब्रिटनने 11 ऑक्टोबरपासून पुन्हा नियम बदलले आणि आता कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाइन ठेवण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. यानंतर भारताने 1 ऑक्टोबरपासून बदललेले नियमही मागे घेतले आहेत.

Related Stories

No stories found.